Homeमनोरंजनआयपीएल 2025 बीसीसीआय अधिकारी मॅच फिक्सिंग आरोपाच्या अहवालात राजस्थान रॉयल्सची बाजू घेतात

आयपीएल 2025 बीसीसीआय अधिकारी मॅच फिक्सिंग आरोपाच्या अहवालात राजस्थान रॉयल्सची बाजू घेतात

मनोरंजन क्रीडा :आयपीएल 2025: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स (Delhi Capitals VS Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव झाल्यावर त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागले होते. संघावर हे आरोप राजस्थान क्रिकेट एसोसिएशनच्या एड-हॉक कमेटीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी लावले होते. मात्र या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर राजस्थानने कठोर शब्दात याला उत्तर दिलं तसेच यावर आक्षेप सुद्धा घेतला. पण आता एका रिपोर्टनुसार समोर आले आहे की आरसीएने केलेल्या या आरोपांच्या मागचे कारण तिकीट विक्री सुद्धा असू शकते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, आरसीएला आयपीएल 2025 दरम्यान सामान्य तिकिटं मिळाली आहेत, जे त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण असू शकतं. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, साधारणपणे प्रति सामना जवळपास 1,800 तिकिटं दिली जातात. परंतु 2025 याची संख्या खूप कमी केली गेली, ज्यामुळे त्यांना प्रति सामना केवळ 1,000 ते 1,200 तिकिटं देण्यात आली आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार राजस्थान रॉयल्सच्या एका सूत्राने माहिती दिली की, ‘यंदा सीजनच्या सुरुवातीलाच बीसीसीआयने आम्हाला स्पष्ट निर्देश दिले होते की  आता आरसीए रद्द झालं आहे त्यामुळे आम्ही सर्व व्यवस्थांसाठी राजस्थान राज्य खेल परिषद (RSSC) यांच्याशीच संपर्क करावा. राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच बिहानी यांनी लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. यासोबतच आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सुद्धा आरसीए  विरुद्ध आवाज उठवला आहे. 2012 मध्ये राजस्थान रॉयल्सचा मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याने त्यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली होती.

काय म्हणाले बीसीसीआयचे अधिकारी?

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आरसीए सध्या रद्द झालं आहे. एक एड-हॉक कमेटी बनवली गेली असून आता निवडणूक जवळ आल्याने असे ड्रामे केले जात आहेत. प्रत्येकजण आता आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. बीसीसीआयकडे अँटी करप्शन यूनिट  आहे जे चुकीच्या गोष्टी आयपीएल पासून दूर ठेवण्यासाठी 24 तास कर करतो. त्यामुळे राजस्थान रॉयल्सवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नाही.

राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबल :

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले असून यापैकी फक्त 2 सामने जिंकण्यात त्यांना यश आलं आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. राजस्थानच्या खात्यात केवळ 4 पॉईंट्स असून त्यांचा नेट रनरेट हा – 0.633 इतका आहे. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!