Homeमनोरंजनसलग 14 दिवस रोज शिलाजीत खाल्ल्याने काय होईल? महिलांनी घ्यावं का?

सलग 14 दिवस रोज शिलाजीत खाल्ल्याने काय होईल? महिलांनी घ्यावं का?

मनोरंजन (आरोग्य) : शिलाजितचे नाव ऐकताच याच सेवन फक्त पुरुष करतात असं सर्वसामान्य समज आहे. आयुर्वैदानुसार शिलाजित हे पुरुषांमधील कमजोरी दूर करण्यासाठी प्रभावी औषध मानले गेले आहे. शिलाजित पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी प्रभावी मानलं जातं. त्यामुळे शिलाजित हे पुरुषांसाठीच आहे असं सर्वसामान्यांना वाटतं. पण सोशल मीडियावर एका तज्ज्ञाने शिलाजित हे महिलांसाठी उपयुक्त आहे की नाही याबद्दल सांगितल आहे.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर हे शिलाजित एखाद्या महिलेने खाल्ले तर? भारतीयांचा असा समज आहे की गरम गोष्टी, किंवा शरीराला उष्णता देणाऱ्या गोष्टी, महिलांसाठी चांगल्या नाहीत. पण हा गैरसमज महिलांना अनेक फायदेशीर गोष्टींपासून दूर ठेवतो. जर आपण शिलाजितबद्दल बोललो तर, एका आरोग्य तज्ज्ञाने सांगितले की जर एखाद्या महिलेने चौदा दिवस सतत शिलाजीतचं सेवन केले तर तिला तिच्या शरीरात चमत्कारिक बदल दिसून येतात.

एक औषध, अनेक फायदे!

अनेक गैरसमजांमुळे महिलांना शिलाजितपासून दूर ठेवले गेलं आहे. हे औषध फक्त पुरुषच घेऊ शकतात असे सांगण्यासाठी बाजारपेठ तयार करण्यात आली आहे. पण जर एखाद्या महिलेने चौदा दिवस सतत शिलाजितचे सेवन केले तर तिला चमत्कार दिसू लागतील. असे केल्यास काय होईल हे एका आरोग्य तज्ज्ञाने सांगितले आहे. त्यांनी सांगितले की जर एखाद्या महिलेने चौदा दिवस शिलाजितचे सेवन केले तर तिला फक्त चोवीस तासांत तिचे पोट आतून आकुंचन पावू लागेल. कारण शिलाजितमुळे तिचे चयापचय अधिक मजबूत होईल आणि चरबी वेगाने कमी होऊ लागेल.

आणखी फायदे काय?

शिलाजित घेतल्यापासून 72 तासांच्या आत, महिलेची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे ती हंगामी आजारांपासून दूर राहू राहते. दर महिन्याला महिलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो, आता त्यांना त्यातून आराम मिळू शकतं. शिलाजितचे सेवन करूनही ताणतणाव नियंत्रित करता येतं. महिलेची पचनसंस्था सात दिवसांत सुधारेल. त्याची पचनसंस्था मजबूत होईल. याशिवाय, शिलाजितचे सेवन केल्याने हृदयरोगांपासूनही आराम मिळतो. चौदाव्या दिवशी महिलेची त्वचा चमकू लागेल. शिलाजीतचे सेवन केल्याने मुरुमांपासूनही आराम मिळतो. याचा अर्थ असा की फक्त चौदा दिवस शिलाजितचे सेवन करणे महिलासाठी खूप फायदेशीर आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तज्ज्ञाने केला आहे.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. शिवतेज न्यूज याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!