Homeमनोरंजनiphone पेक्षा कमाल? चंद्राचा अगदी स्पष्ट फोटो काढणारा 200 मेगापिक्सल कॅमेराचा 'हा'...

iphone पेक्षा कमाल? चंद्राचा अगदी स्पष्ट फोटो काढणारा 200 मेगापिक्सल कॅमेराचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात कधी होणार लाँच?


टेक न्यूज: आयफोन… अगदी कॅमेरासारखे सुस्पष्ट फोटो काढण्याचं स्वातंत्र्य हा फोन देतो आणि यासोबतच फोनमध्ये काही असे फिचर्सही युजरना मिळतात जे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभवच बदलतात. आतापर्यंत आयफोनला टक्कर देणारे अनेक स्मार्टफोन बाजारात दाखल झाले. पण, त्यातही सर्वांनाच यश लाभलं असं नाही. असं असलं तरीही एक फोन मात्र इथं अपवाद ठरू शकतो. अर्थात आयफोनला टक्कर देऊ शकतो.

शंभर दिडशे नव्हे तर तब्बल 200 मेगापिक्सल इतका कमाल कॅमेरा असणारे दोन स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच केले जाणार आहेत. Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra असे हे स्मार्टफोनचे मॉडेल असून बार्सिलोना इथं सुरु असणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 मध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. ज्यानंतर कंपनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून हा स्मार्टफोन भारतात नेमका कधी लाँच केला जाणार याचीसुद्धा माहिती दिली.

फिचर्स आणि किंमत पाहूनच घ्या…

जागतिक स्तरावर Xiaomi 15 Ultra या फोनची किंमत दोन प्रकारच्या मेमरी स्टोरेजवर आधारित आहे. यामध्ये 16GB जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज असणाऱ्या बेस मॉडेलची किंमत EUR 1,499 (जवळपास 1,36,100 रुपये)  इतकी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतातही फोनची हीच किंमत असेल असंही सांगण्यात येत आहे.

Xiaomi 15 Ultra 6.73  इंच WQHD+ क्वाड कर्व्ड LTPO AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध करून देण्यात आला असून, या फोनची 5,410mAh बॅटरी  90W  वायर्ड तर, 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

दमदार कॅमेरा सेटअप ही या मोबाईलची जमेची बाजू. हा कॅमेरा इतका कमाल, की कैक मैल दूर असणाऱ्या आभाळातील चंद्राचा फोटोसुद्धा अगदी सहजपणे आणि तितच्याच स्पष्ट रुपात टीपला जाऊ शकतो.

शाओमीच्या या स्मार्टफोनला 1 इंच टाइप LYT-900 सेंसरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सलचा सोनी IMX858 टेलिफोटो कॅमेरा 4.3x ऑप्टिकल झूमसह 200 मेगापिक्सलचा ISOCELL HP9 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळं हा फोन सॅमसंग आणि आयफोनला टक्कर देईल यात वाद नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!