Homeदेश-विदेशगोळीबारात ठार होण्यापूर्वी पत्नी पल्लवी यांच्यासमवेत कर्नाटक शिवमोग्गा मंजुनाथचा पहलगम दहशतवादी हल्ला...

गोळीबारात ठार होण्यापूर्वी पत्नी पल्लवी यांच्यासमवेत कर्नाटक शिवमोग्गा मंजुनाथचा पहलगम दहशतवादी हल्ला व्हायरल व्हिडिओ


Pahalgam Terror Attack: कर्नाटकातील शिवमोगा येथील मंजुनाथ यांचा काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची पत्नी पल्लवी यांच्या डोळ्यांसमोर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. त्यांनी मृतदेह तातडीने विमानाने नेण्यात यावा अशी विनंती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथ त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांच्या लहान मुलासह खोऱ्यात सुट्टीचा आनंद घालवण्यासाठी गेले होते.

दरम्यान हल्ल्याआधी मंजुनथ पत्नी पल्लवीसह बोटिंगचा आनंद घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते सांगत आहेत की, “मी मंजुनाथ, कर्नाटकच्या शिवमोगा येथून आहे. आम्ही इंडियन ट्रॅव्हल्स टूरमधून बुकिंग करत काश्मीर फिरण्यासाठी आलो आहोत. आज आमचा काश्मीर टूरचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही बोट हाऊसमध्ये थांबलो होतो. आता आम्ही शिकारा राईड करत आहे. मोहम्मद रफीक यांनी हे आयोजित केलं आहे. काजोल ठाकूरने ही सर्व टूर आयोजित केली आहे. खूप चांगली सर्व्हिस आहे”.

दरम्यान पल्लवी यांनी हल्ला झाला तेव्हा नेमकं काय झालं हे ‘इंडिया टुडे’ शी संवाद साधताना सांगितलं आहे. “आम्ही तिघे मी, माझा नवरा आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो. दुपारी 1.30 च्या सुमारास हे घडलं. आम्ही पहलगाम येथे होतो. माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा जागीच मृत्यू झाला,” असं त्यांनी सांगितलं. “ते अजूनही वाईट स्वप्नासारखे वाटत आहे,” असा आक्रोशही त्यांनी मांडलं. हल्ल्यानंतर लगेचच स्थानिक नागरिक तिच्या मदतीला आले. तीन स्थानिक लोकांनी मला वाचवले असंही त्यांनी सांगितलं.

हल्लेखोर हिंदूंना लक्ष्य करत असल्याचं दिसत होतं असंही त्यांनी सांगितलं. “तीन ते चार लोकांनी आमच्यावर हल्ला केला. मी त्यांना म्हटलं, मलाही मारून टाका, तुम्ही माझ्या नवऱ्याला आधीच मारले आहे. त्यापैकी एक म्हणाला, मी तुला मारणार नाही. हे मोदीला सांगा”.

त्यांनी अधिकाऱ्यांना पतीचा मृतदेह लवकरात लवकर शिवमोगा येथे परत नेण्यात यावा अशी विनंती केली आहे. “मृतदेह सहजासहजी खाली आणता येणार नाही. तो एअरलिफ्ट करायला हवा. तो ताबडतोब परत आणावा अशी आमची इच्छा आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक्सवरील पोस्टमध्ये हल्ल्याचा निषेध केला. “या धक्कादायक घटनेतील बळींमध्ये कन्नडवासी देखील आहेत. ही बातमी मिळताच मी एक आपत्कालीन बैठक बोलावली आणि मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला. मी दिल्लीतील निवासी आयुक्तांशीही बोललो आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!