मनोरंजन (क्रीडा): Ayush Mhatre IPL debut: 17 वर्षांच्या आयुष म्हात्रेने त्याचं आयपीएलमधील दमदार पदार्पण केलं. त्याच्या वयामुळे आणि खेळामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान आयुष म्हात्रेने भर सामन्यातच एका व्यक्तीला रडवलं. वानखेडे स्टेडियमवरही रडतांचं असेच काहीस दृश्य पाहायला मिळाल्याने हा प्रश्न उपस्थित होतो. चेन्नई आणि मुंबई यांच्यात हा सामना होता. या सामन्यात १७ वर्षांच्या म्हात्रे खेळत असताना मैदानावर जे दिसले ते खूपच भावनिक दृश्य होते. एक लहान मुलगा 17 वर्षांच्या म्हात्रेच्या प्रत्येक शॉटवर स्टेडियममध्ये रडताना दिसला. हे त्याचे आनंदाश्रू होते, जे त्यावेळी थांबायला तयार नव्हते. कोण होता हा लहान मुलगा? चला जाणून घेऊयात…
कोण होता तो मुलगा?
वानखेडे स्टेडियमवर जेव्हा तरुण सीएसके खेळाडू आयुष म्हात्रे त्याच्या आयपीएल पदार्पणात मुंबई इंडियन्सविरुद्ध जोरदार फलंदाजी करत होता तेव्हा स्टँडमध्ये उभा असलेल्या एका छोट्या मुलाच्या भावना उफाळून आल्या होत्या. हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी आयुष म्हात्रेचा चुलत भाऊ आहे. आपल्या भावाची बॅटिंग बघून त्याच्या धाकट्या चुलत भावाच्या डोळ्यात पाणी आले. त्याच्या भावाला एवढ्या मोठ्या स्टेजवर खेळतानाचा क्षण तो स्टँडमध्ये बसून पाहत होता. चुलत भावाचा स्टँडमध्ये रडण्याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत हँडलवर शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आयुष म्हात्रेचे दमदार पदार्पण
आयुष म्हात्रे मुंबईच्या या प्रतिभावान तरुणाने आयपीएल पदार्पणात सीएसकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. आयुष म्हात्रे यांनी 32 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावांची छोटी पण वादळी खेळी केली.
एमआय आणि सीएसके यांच्यात रंगला सामना
मुंबईविरुद्धचा सामना सीएसकेसाठी ‘करो या मरो’सारखा होता. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, सीएसकेचे अजूनही 6 सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी संघाला सर्व सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील. एका पराभवामुळे सीएसकेचा संपूर्ण खेळ खराब होऊ शकतो. सौ.झी.न्यूज
































