Homeमनोरंजनग्रीष्मकालीन आरोग्य टिप्स सोललेली किंवा काकडी कशी खायची हे माहित आहे हे...

ग्रीष्मकालीन आरोग्य टिप्स सोललेली किंवा काकडी कशी खायची हे माहित आहे हे सर्वोत्तम मानले जाते

मनोरंजन (आरोग्य) : सोललेली किंवा काकडी कशी खायची तबत नाही: उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये काकडीचा आवर्जून समावेश होतो. कलिंगड, आंबा याबरोबरच काकडी खाण्याचं प्रमाणही उन्हाळ्यामध्ये वाढल्याचं दिसून येतं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि पोटभरीचं म्हणून काकडी हा अगदी स्वस्तात मस्त पर्याय आहे. मात्र अनेकदा आपण एखादी गोष्ट खाताना ती साळून खातो. काकडीही साळून खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र यामुळेच काकडी साळून खाणं चांगलं की सालासकट यावरुन बऱ्याचदा एकाच घरात दुमत असलेलं दिसतं.

काकडी खात नाही.

खरं तर आपण अनेक फळं आणि भाज्या साळून खातो. मात्र त्यामुळे या भाज्यांमधील महत्त्वाचे घटक आपण या सालांसकट गमावतो. असाच काहीसा प्रकार काकडीबाबत होतो असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. काकडीमध्ये फायबर, पोषक तत्वं आणि अँटीऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात असतात. मात्र यापैकी बहुतांश घटक हे काकडी सालून खाल्ल्यास शरीरात पोहचत नाही. ‘वेबएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, काकडी न साळता खाल्ल्यास अधिक पोषक तत्वं शरीराला मिळून त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. अर्थात काकडी न साळता खाणार असाल तर ती खाण्याआधी स्वच्छ धुवून घेणं आवश्यक असतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

सिंथेटीक वॅक्स लावतात, मात्र…

ग्राहकांना काकडी अधिक फ्रेश आणि चकाकती दिसावी म्हणून तिच्यावर अनैसर्गिक किंवा कृत्रिम सिंथेटीक वॅक्स म्हणजेच मेण लावलं जातं. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. त्यामुळेच काकडी स्वच्छ धुण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या कोमट पाण्यात धुवाव्यात. मात्र स्वच्छतेच्या नावाखाली काकडीची सालं काढून खाणं हा फारसा शहाणपणाचा निर्णय ठरत नाही. कारण सालींबरोबर काकडीमधील बरीचशी पोषक तत्व निघून जातात.

काकडी खाण्याचे फायदे : –

> काकडीमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्यास म्हणजेच शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
> काकडीमधील फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास टाळता येते. काकडीच्या सेवनामुळे पचनसंस्था सुधारते.
> काकडीमधील हेच फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
> काकडीमध्ये कॅलरी, फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम इत्यादीचे प्रमाण कमी असते.
> काकडीमध्ये असलेले जीवनसत्व के रक्त गोठण्यास मदत करते आणि हाडं निरोगी ठेवतं.
> काकडीमध्ये असलेले अ जीवनसत्वं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
> काकडीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
> काकडीमधील सीयबी नावाचे तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.

(Disclaimer – येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. “शिवतेज न्यूज” तास याला दुजोरा देत नाही.) सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!