Homeदेश-विदेशमनसा मुसा सोन्याने इजिप्तला सूचित करणार्‍या वोल्डमधील सर्वात श्रीमंत मनुष्य ऐतिहासिक तपशील...

मनसा मुसा सोन्याने इजिप्तला सूचित करणार्‍या वोल्डमधील सर्वात श्रीमंत मनुष्य ऐतिहासिक तपशील माहित आहे

देश-विदेश : सोन्याचे तथ्य मन्सा मुसा वोल्डमधील सर्वात श्रीमंत माणूस: भारतात सोन्याच्या किमती उच्चांक गाठताना दिसत आहेत. तिथं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयतशुल्कासंदर्भातील निर्णयानं सारं जग बुचकळ्यात पडलेलं असतानाच जागतिक अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचे होणारे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. गुंतवणुकदारांना शेअर बाजारावर घोंगावणारं संकट पाहता घाम फुटला आहे. तर, सोन्याचे गगनाला भिडणारे दरही अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.

जगभरात सोन्याच्या दरात आलेली ही उसळी पाहता याच सोन्यानं एकाद देशाच्या अर्थव्यवस्थेलाच सुरूंग लावल्याचा किस्सा विसरता येत नाही. त्यासाठी इतिहासाच डोकावावं लागेल. आफ्रिकेतील माली या देशाचं नाव तुम्ही ऐकलच असेल. आजच्या घडीला हा देश जगातीर गरिब देशांपैकी एक असला तरी, कधीकाळी हाच माली देश आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता.

मनसा मुसा आणि त्याची श्रीमंती…

आफ्रिकेच्या माली देशाचा राजा हा त्या काळात तेव्हापासून आतापर्यंत साधारण 700 वर्षे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी विराजमान होता. 1280 मध्ये जन्मलेल्या या राजाचं नाव मनसा मुसा. 1312 पर्यंत मालीवर मनसा मुसाच्या मोठ्या भावाचं राज्य होतं. पण, भाऊ ज्यावेळी एका मोठ्या प्रवासावर गेला तेव्हा मनसा मुसाला त्याचं स्थान मिळालं. 1312 पासून 1337 पर्यंत इथं राज्य केलं. त्यावेळी माली हा देश जगातील सोन्याच्या उत्पादनासाठीचा एक मोठा देश असून, इजिप्त, पर्शिया, वेनिस या देशातून व्यापारी इथं येत.

हा तोच काळ होता जेव्हा सोन्याची मागणी जास्त असून जगातील जवळपास निम्मं सोनं या मनसा मुसाकडे होतं. हा राजा त्या काळात 415 अब्ज डॉलर इतक्या अगणित संपत्तीचा मालक होता. मात्र त्याच्या देशाची मात्र जगभरात ओळख नव्हती. 1324 मध्ये मनसा मुसानं हज यात्रेची सुरुवात केली. इजिप्तहून तो मक्केसाठी रवाना झाला. अरब इतिहासकारांच्या माहितीनुसार त्याच्या ताप्यात हजारो लोक आणि कैक उंट होते. प्रत्येक उंटावर तेव्हा 136 किलो सोनं लादण्यात आलं होतं.

असं म्हणतात की मनसा मुसा जेव्हा इजिप्तची राजधानी कैरो इथं पोहोचला तेव्हा त्याच्या लोकांनी तिथं पाण्यासारखं सोनं तेथील लोकांना दिलं. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाच्या वाट्याला हे सोनं आलं. पण, याच सोन्यानं इजिप्तचा घात केला. तिथं पुढील 12 वर्षे सोन्याचे दर कोसळू लागले. इजिप्तमधील नागरिकांनी काम करणं सोडून दिलं. इथं नागरिकांकडे सोनं होतं मात्र त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी काहीच नव्हतं, कारण इथं कुणीच काम करत नव्हतं. महागाई गगनाला गवसणी घालू लागली आणि इजिप्त आर्थिक मंदीच्या लाटेत गटांगळ्या खाऊ लागला. तब्बल 12 वर्षे या देशानं आर्थिक संकटाचा सामना केला.

हजवरून परतल्यानंतर मनसा मुसानं त्याच्या देशातील शहरांना नवं रुप देण्यास सुरुवात केली. जगाच्या नकाशावर त्याचा माली हा देश नवी ओळख प्रस्थापित करू लागला होता तितक्यातच 1337 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मनसा मूसाचं निधन झालं. ज्यानंतर त्याच्या मुलाकडे साम्राज्याची धुरा सोपवण्यात आली मात्र त्यांना ही जबाबदारी सांभाळता आली नाही आणि या साम्राज्याचे तुकडे झाले. आजच्या घडीला तेव्हाचं धनाढ्य माली एक गरीब राष्ट्र म्हणून गणलं जातं हेच दुर्दैव. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!