Homeमनोरंजनयुझवेंद्रसोबतचा 16 वर्ष जुना फोटो शेअर करत प्रीति झिंटा म्हणाली, 'त्यानं माझ्या...

युझवेंद्रसोबतचा 16 वर्ष जुना फोटो शेअर करत प्रीति झिंटा म्हणाली, ‘त्यानं माझ्या टीममध्ये…’

मनोरंजन (क्रीडा) : प्रीटी झिंटा नंतर शेअर्स आणि आता युझवेंद्र चहलसह फोटो : पंजाब किंग्सनं IPL 2025 मध्ये आपल्या खेळाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यामुळे प्रीती झिंटा आपल्या संघाच्या कामगिरीवर खूपच आनंदी आहे. विशेषतः युझवेंद्र चहलमुळे ती खूप आनंदी आहे. त्याचं कारण म्हणजे, पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून ते जिंकत असलेला सामना हा जणू काही हिसकावून घेतला आहे. त्या विजयाचं कारण हा युझवेंद्र चहल आहे त्यानं यात खूप मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे प्रीती झिटांनं सोशल मीडियावर युझवेंद्र चहलचं कौतुक करत एक भावनिक आणि मोठी पोस्ट शेअर केली आहे.

गुरुवारी प्रीतिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहलसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये प्रीतिनं अंडर-19 टीमसोबत पोज देताना दिसत आहे. ज्या टीममध्ये चहल देखील दिसला होता. तर पुढच्या फोटोमध्ये चहलला मिठी मारताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दोघं कॅमेऱ्याकडे पाहत हाताता ट्रॉफी घेऊन पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत प्रीतिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की ‘हे सगळं कसं सुरु झालं आणि आता कुठ पर्यंत पोहोचलं आहे. मी चंडीगढमध्ये  2008/09 मध्ये किंग्स कप दरम्यान, चहलला भेटली होती. मी क्रिकेटमध्ये नवीनचं होते आणि तो  अंडर-19 क्रिकेटर होता. या गोष्टीला 16 वर्ष झाली आहेत आणि या 16 वर्षांमध्ये मी त्याला क्रिकेटच्या जगात स्वत: चं स्थान मिळवत आणि नाव कमावताना पाहिलं.’

पुढे प्रीतिनं म्हटलं, ‘त्यानं माझ्या टीममध्ये कायम स्वरूपी रहावं ही माझी इच्छा आहे, पण असं झालं नाही… आता पर्यंत! आमचा अखेरचा खेळ या सगळ्याचं खूप चांगलं उदाहरण आहे की मी इतक्या वर्षांपासून चहलची स्तुती का करायचे. युझवेंद्र तुला माझ्या टीममध्ये घेऊन मी खूप आनंदी आहे. मला कायमच तुला हसत आणि असाच यशस्वी होताना पाहायचं आहे.’

प्रीति झिंटानं शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘याचा अर्थ युझवेंद्र हा नेहमीच पंजाब किंग्सच्या रडावर होता.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘युझवेंद्रचं कमबॅक झालं आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘युझवेंद्र भाऊ तू काय कमाल केलीस.’ सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!