Homeमनोरंजनविस्तारित यकृताची लक्षणे काय आहेत

विस्तारित यकृताची लक्षणे काय आहेत

मनोरंजन (आरोग्य) : वाढलेल्या यकृताची लक्षणे: यकृत हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. यकृत ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्याचबरोबर यकृताशी संबंधित कोणताही आजार झाल्यास त्या व्यक्तीला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाण वाढल्यामुळे इतर समस्या देखील उद्भवू शकतात. साधारणपणे यकृत खराब झाल्यावर सूज येते. हे कधीकधी कर्करोग किंवा वाढत्या चरबीमुळे होते. कधीकधी यकृताचा आकार वाढतो, हे संक्रमण किंवा दीर्घकाळ चाललेला यकृत रोग यासारख्या दुसऱ्या आजारामुळे असू शकतो.

यकृत वाढण्याचा अर्थ काय?

Cleveland Clinic नुसार, “यकृत अनेक महत्त्वाची कार्य करतं, त्यापैकी एक म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे योग्य नियमन करणे. जर एखाद्याचे यकृत मोठे झाले असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की यकृत सूजले आहे आणि त्याच्या सामान्य आकारापेक्षा जास्त वाढला आहे. हे फक्त एक लक्षण असू शकते किंवा काहीवेळा ते रक्ताच्या गंभीर आजाराचे देखील असू शकते.”

यकृत वाढल्याची लक्षणं

यकृत मोठे झाल्यावर सहसा कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत. तथापि, काही गंभीर प्रकरणांमध्ये, पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होऊ शकतात. यकृत पोटाच्या उजव्या बाजूला स्थित आहे. त्याच्या वाढीमुळे, एखाद्याला पोटदुखी, फुगणं किंवा जडपणा जाणवू शकतो. तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, तर तुमच्या पोटाला स्पर्श करूनही यकृताला सूज आली आहे की नाही समजेल. तर सामान्य व्यक्तीला यकृताला स्पर्श करुन समजणार नाही.

यकृत वाढण्याची अन्य लक्षणंही जाणवू शकतात

थकवा जाणवणं – जेव्हा यकृताचा आकार वाढतो, तेव्हा तुम्हाला थकवा जाणवू शकतो. एखाद्या व्यक्तीला थोडंसं काम करतानाही ऊर्जा कमी वाटते. व्यस्त काम करतानाही माणसाला अडचण जाणवते.

भूक न लागणं – यकृत वाढल्यामुळ, फुगणे आणि पोटात जडपणा जाणवतो. या अवस्थेत अनेकदा भूक कमी लागते आणि व्यक्तीला काहीही खावेसे वाटत नाही. परिणामी शरीरात पोषकतत्वांची कमतरता निर्माण होते. एवढंच नाही तर भूक न लागल्यामुळे व्यक्ती अन्न खात नाही, जे त्याच्या इतर आजार आणि अशक्तपणाचे प्रमुख कारण बनते.

कावीळ – एखाद्या व्यक्तीला यकृताच्या कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास कावीळ होऊ शकते. कावीळ झाल्यावर त्वचा पिवळी पडते आणि डोळेही पिवळे पडतात. यकृत मोठे झाल्यास अशा प्रकारची परिस्थिती देखील उद्भवू शकते. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!