Homeमनोरंजनबजेट रेनो ट्रायबर ऑटो न्यूज 7 सीटर कारची किंमत

बजेट रेनो ट्रायबर ऑटो न्यूज 7 सीटर कारची किंमत

मनोरंजन (ऑटो) : बजेट श्रेणीत 7 सीटर कार: सणासुदीच्या या दिवसांमध्ये कुटुंबाला एखादा आश्चर्याचा धक्का द्यायच्या विचारात असाल तर एक उत्तम पर्याय तुमच्या प्रतीक्षेत आहे. हा पर्याय आहे एका अफलातून फॅमिली कारचा. हल्ली कार खरेदीचा पर्याय विचारात आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या किमान थेट कुटुंबाला तरी एकत्र सामावून घेईल अशीच कार हवी याचसाठी सर्व मंडळी आग्रही असल्याचं पाहायला मिळतं. या सर्व हिशोबात पैशांचा मुद्दा डोकं वर काढतो आणि तिथं मात्र या स्वप्नाला वेसण घातलं जातं.

इथून पुढं मात्र असं होताना दिसणार नाहीय. कारण, सध्या बहुतांश कार कंपन्या सामान्यांच्या गरजा आणि त्यांची खर्च करण्याची आवक पाहता त्याच अनुषंगानं कार डिझाईन करत आहेत. त्यातलाच एक उत्तम, 7 जणांची आसनक्षमता असणारा पर्याय म्हणजे रेनॉ ट्रायबर.

1.0 लीटरचं 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन असणाऱ्या या कारमधून 96एनएमचा टॉर्क आणि 72 पीएसची मॅक्सिमम पॉवर जनरेट होते. ज्यामुळं ही कार प्रति लीटर 18.29 ते 19 किमी इतकं मायलेज देते. 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक एएमटी असे दोन पर्याय या कारमध्ये दिले जातात. कारमध्ये सर्व बेसिक इंटेरिअर असून यामध्ये 20.32 सेंटीमीटरची टचस्क्रीन इंफोटेन्मेंच सिस्टीम, स्टीअरिंग माऊंटेड ऑडिओ, फोन कंट्रो, एलईडी, इंस्ट्रूमेंट क्सस्टर, स्मार्ट अॅक्सेस कार्ड, पुश स्टार्ट-स्टॉप बटन, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलँप, अॅडजस्टेबल ड्रायवर सीट, कूल्ड स्टोरेज, 182 mm चं हाय ग्राऊंड क्लिअरन्स अशा फिचरसह ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे.

4 एअरबॅग (दोन पुढे आणि 2 बाजूला) असल्यानं या कारला ग्लोबल एनकॅपनं प्रौढांच्या हिशोबानं 4 स्टार सेफ्टी रेटिंग दिलं आहे. तर, लहान मुलांच्या दृष्टीकोनातून 3 स्टार रेटिंगसह ही कार अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

किंमत किती?

रेनो ट्रायबर कारची किंमत 6.09 रुपयांपासून सुरू होऊन या कारच्या टॉप मॉडेलसाठी 8.97 लाख रुपये मोजावे लागतात. ही कार ज्या सेग्मेंटमध्ये विकली जात आहे त्या एमपीव्ही सेग्मेंटमध्ये मारुति अर्टिगाचं वर्चस्व असलं तरीही किमतीच्या तुलनेत रेनॉची ट्रायबर सरशी करताना दिसते. अर्थात परफॉर्मन्सच्या बाबतीत अर्टिगा आघाडीवर असली तरीही जी किंमत या कारसाठी मोजली जात आहे त्या हिशोबानं ही ‘बेस्ट डील’ आहे असं म्हणणं गैर नाही. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!