Homeदेश-विदेशElon Musk : 14 वं मूल एलॉन मस्क आहे की...! पितृत्व चाचणीचा...

Elon Musk : 14 वं मूल एलॉन मस्क आहे की…! पितृत्व चाचणीचा निकाल समोर आला अन्…म्हणून ‘या’ तरुणीला 25 लाख डॉलर देऊन…


एलोन मस्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पोसएक्सचा मालक एलॉन मस्कबद्दल अजून एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. मॉडल एशले सेंट क्लेयर (Ashley St Clair) हिने काही दिवसांपूर्वी आपलं मुलं हे एलॉन मस्कचं मूल असल्याचा दावा तिने केला होता. हा मुलगा एलॉन मस्कचा वारसदार आहे की नाही याबद्दल न्यू यॉर्क सुप्रीम कोर्टाने पितृत्व चाचणी करण्याचे आदेश दिले होते. या रिपोर्टचा अहवाल समोर आला असून एलॉन मस्क हे मुलाचे वडील म्हणून 99.9999% पुष्टी झाली आहे. तर द वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजे) च्या एका नवीन अहवालानुसार या बाळाचं नाव रोम्युलस आहे. या रिपोर्टनुसार 14 वं मूल एलॉन मस्क यांचं आहे. (world richest Elon Musk father of the 14th child paternity test results revealed Ashley st clair surrogacy)

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने केली होती घोषणा…

26 वर्षीय एशले सेंट क्लेयर (Ashley St Clair) 14 फेब्रुवारी 2025 ला तिनं एक्सच्या माध्यमातून जगभरात एकच खळबळ माजवली होती. तिने यात सांगितलं होतं की, 2024 मध्ये एलॉन मस्क यांनी त्यांच्या 14 व्या बाळाचं स्वागत केलं आहे. त्यावेळी तिने ही बातमी खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर मुलाचं संरक्षणाच्या दृष्टीकोनातून तिने ही बातमी सार्वजनिक केली. 2023 मध्ये सोशल मीडियावर त्यांची भेट झाली. त्यानंतर एलॉन मस्कने तिला सॅन फ्रान्सिस्कोमधील ट्विटर कार्यालयात भेट देण्याचं आमंत्रण दिलं, असं तिने सांगितलं. एशले सेंट क्लेयर यात पुढे म्हणाली की, आमच्या मुलाला सामान्य आणि सुरक्षित वातावरणात वाढू देण्याचा माझा मानस आहे. म्हणून मी विनंती करते की मीडियाने आमच्या मुलाच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आक्रमक रिपोर्टिंगपासून दूर राहावं.

मस्क दरमहा पैसे देण्याची ऑफर

सेंट क्लेअरने असेही सांगितले की तिला मुले जन्माला घालण्याच्या बदल्यात दरमहा 2.5 मिलियन डॉलर म्हणजेच साधारण 25 कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यासोबतच एक अट होती की त्यांनी मुलाच्या जन्म प्रमाणपत्रातून मस्कचे नाव काढून टाकावे. तो मस्कचा मुलगा आहे हे सार्वजनिक करू नका. जरी त्यांनी गोपनीयतेच्या करारावर स्वाक्षरी केली नसली तरी, त्यांनी कायदेशीर कागदपत्रांमधून मस्कचे नाव काढून टाकले. यानंतर, त्याची मासिक मदत $४०,००० वरून $२०,००० करण्यात आली.

एलोन मस्क चाइल्ड प्लॅन समोर…

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, मस्क येणाऱ्या पिढ्यांना बळकटी देण्यासाठी अधिकाधिक मुलांना जन्म देण्याच्या योजनेवर काम करत आहेत, ज्याबद्दल बरेच लोक म्हणत आहेत की त्यांना मुलांची फौज वाढवायची आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मस्क सरोगसीची मदत घेत आहे. तो महिलांसोबत गोपनीय करार करून घेत आहे, ज्यामध्ये मुले जन्माला घालण्याशी संबंधित बाबींचा समावेश आहे. तो महिलांना मुलांना जन्म देण्याच्या बदल्यात पैसे देऊ करत आहे.

अहवालात असेही उघड झालं आहे की मस्कची टीम महिलांशी संपर्क साधते आणि त्यांना सरोगेट मदर बनण्यासाठी प्रोत्साहित करते. क्रिप्टो प्रभावशाली टिफनी फोंग यांनी मस्कने पाठवलेल्या ऑफर सार्वजनिक केल्या, त्यानंतर मस्कने तिला सोशल मीडियावर अनफॉलो केले. शिवोन झिलिस ही मस्क आणि त्याच्या कुटुंबातील चार मुलांची आई आहे. तिला विशेष दर्जा असून ती वारंवार जागतिक नेत्यांच्या बैठकांमध्ये आणि प्रमुख कार्यक्रमांमध्ये मस्कसोबत दिसते. दुसरीकडे, गायिका ग्रिम्स, ज्यांना मस्कपासून तीन मुले आहेत. तिने मुलांच्या ताब्यावरून मस्कशी सार्वजनिकपणे वाद घातला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली...

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!