Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयावर चीनच्या आशियाई देशाने 245 टक्के दर ठेवला आहे

डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयावर चीनच्या आशियाई देशाने 245 टक्के दर ठेवला आहे


डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरांवर चीन प्रतिक्रिया देते: अमेरिकेनं चीनसंदर्भात कोणतीही सहानुभूती न दाखवता या आशियाई राष्ट्राला इंगा दाखवणं सुरूच ठेवलं आहे. सातत्यानं केल्या जाणाऱ्या आयात शुल्काच्या माऱ्यादरम्यान आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वातील अमेरिकी शासनाच्या वतीनं चीनवर एकूण 245 टक्क्यांचं आयात शुल्क आणि त्यासंदर्भातील निर्बंध लागू केले आहेत. व्हाईट हाऊसच्या वतीनं यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली. ज्यामुळं या नव्या निर्बंधांमुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावात आणखी भर पडल्याचं म्हटलं जात आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं डिवचलं जात असतानाच आता या नव्या निर्णयासंदर्भातसुद्धा एक अतीव महत्त्वाची प्रतिक्रिया देत चीननं अमेरिकेचच नव्हे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार चीननं यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेला थेट इशारा दिला. टॅरिफ संदर्भातील हा खेळ सुरूच ठेवला तर, चीन या गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष करेल अशीच ठाम भूमिका चीनच्या वतीनं मांडण्यात आली.

दरम्यान, अमेरिकेनं चीनला डिवचणं सुरू ठेवलेलं असतानाच 75 देश आपल्या या निर्णय आणि कराराशी सहमत असून, व्यापारासाठी तयार असल्याचं महासत्ता राष्ट्राकडून जाहीर करण्यात आलं. ज्या देशांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवली, त्यांच्यावर सध्यातरी कोणतंही वाढीव आयातशुल्क लागू करण्यात आलं नसल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं. चीननं अमेरिकेच्या कारवाईला उत्तर देत उचललेल्या पावलामुळंच या देशा ला 245 टक्के आयात शुल्काचा भुर्दंड सोसावा लागत आहे, असंच अमेरिकेकडून वारंवार अधोरेखित करण्यात येत आहे.

व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या फॅक्ट शीटमध्ये काही गंभीर आरोप लावण्यात आले असून, चीननं अमेरिकेच्या गॅलियम, जर्मेनियम, एंटीमनी आणि इतर हायटेक समाग्रीवरील निर्यातीवर बंदी आणणल्याचा इथं उल्लेख करण्यात आला आहे. या सामग्रीचा वापर लष्करी सेवांसाठीच्या कामासाठी केला जात असून, अडचणी वाढत असल्यामुळंच अमेरिकेनं चीनच्या या भूमिकेवर नाराजीचा सूर आळवला.

चीननं सहा मौल्यवान धातूंसह अनेक इतरही काही महत्त्वाच्या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळं जगभरातील पुरवठा साखळीवर याचा परिणाम व्हावा हा यामागचा हेतू असल्याचा आरोप अमेरिकेनं चीनवर केला आहे. तेव्हा आता या Tariff War मध्ये पुढं नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!