Homeदेश-विदेशकोणत्या धर्मासाठी वेगळं कोल्‍ड ड्र‍िंक बनवते Coca-Cola? जाणून तुम्ही व्हाल हैराण

कोणत्या धर्मासाठी वेगळं कोल्‍ड ड्र‍िंक बनवते Coca-Cola? जाणून तुम्ही व्हाल हैराण

देश-विदेश : कोका-कोला: कोल्ड ड्रींक… उन्हाळ्याच्या दिवसांत या शीतपेयांना इतकी पसंती दिली जाते, की दर उन्हाळ्यात एक तरी नवा ब्रँड किंवा पेय बाजारात विक्रीसाठी आल्याचं पाहायला मिळतं. अशा या शीतपेयांच्या गर्दीत साधारण 1886 पासून आपलं स्थान अबाधित ठेवणारी एक कंपनी म्हणजे कोका कोला. जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल पण, कोका कोला एका खास धर्माच्या नागरिकांसाठी वेगळ्या पद्धतीचं शीतपेय तयार करते.

पाहताक्षणी विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. कोका कोला कंपनीकडून यहूदी अर्थात ‘ज्यू’ धर्मातील नागरिकांसाठी त्यांच्या या शीतपेयाचा वेगळा प्रकार तयार केला जातो. सर्वसाधारण शीतपेय आणि हे विशेष शीतपेय यामध्ये बाटलीच्या झाकणावरून फरक ओळखता येतो. या खास बाटलीच्या झाकणाचा रंग लालऐवजी पिवळा असतो. आता यामागचं नेमकं कारणही जाणून घ्या…

ज्यू धर्मात एक विशेष सुट्टीचा कालावधी असतो, ज्याला पासओवर (Passover) असं म्हणतात. या कालावधीत ज्यू धर्मातील लोक मका, गहू, राई आणि बिया अशा चाही पदार्थांचं सेवन जाणीवपूर्वक टाळतात. सर्वसाधार कोकाकोलामध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं, ज्यामुळं हे पेय पासओवर काळात पिणं योग्य ठरत नाही.

ज्यू धर्मातील नागरिकांच्या आहारविषयक सवयींचा आदर ठेवण्यासाठी म्हणून कंपनी पासओवर काळात त्यांच्यासाठी या पेयाचं कॉर्न फ्री वर्जन तयार करते. यावेळी त्यात कॉर्न सिरपऐवजी ऊसापासून तयार करण्यात आलेली साखर मिसळली जाते, ज्याच्या सेवनास पासओवर काळात परवानगी असते.

साधारण कोक आणि पासओवर काळातील कोकमधील फरक ओळखता यावा यासाठी कंपनीकडून त्याच्या झाकणाला चकाकणारा पिवळा रंग दिला जातो. ज्यावरून हे पेय पासओवर काळासाठी कोशर अर्थात शुद्ध असल्याचं स्पष्ट होतं. कंपनीकडून घेण्यात आलेला हा निर्णय फक्त शीतपेयातील सामग्रीतील बदलासंदर्भातील नसून, कंपनीनं एकंदरच प्राधान्य दिलेल्या प्रक्रियेलासुद्धा अधोरेखित करतं.

कमाल गोष्ट म्हणजे फक्त ज्यू च नव्हे, तर अनेक बिगर जू मंडळीसुद्धा या अनोख्या कोकच्या शोधात त्याची विक्री नेमकं कुठं होते हे पाहत असतात. ऊसाच्या साखरेपासून तयार करण्यात आलेलं कोक हे कॉर्न फ्रुक्टोजपेक्षा अधिक चवदार असतं ज्यामुळं त्याला अधिक पसंती मिळते असं म्हटलं जातं.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतले

0
मराठी बातम्याआंतरराष्ट्रीयबांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतलेढाका3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार डॉ. जाहेद उर रहमान...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

0
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ...
spot_img

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...

फुटबॉल विश्वचषकादरम्यान इराणी प्रशिक्षण-केंद्राबाहेर मृतदेह सापडला:संघाने कॅम्प अमेरिकेतून मेक्सिकोला हलवला होता; उद्या न्यूझीलंडविरुद्ध पहिला...

0
फुटबॉल विश्वचषकादरम्यान, इराण फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण तळाजवळ एका कारमध्ये मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीतून मृतदेह ताब्यात...
error: Content is protected !!