देश-विदेश :मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग: जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या मेटा कंपनीपुढं पुन्हा एकदा काही अडचणींनी डोकं वर काढल्याचं पाहायला मिलत आहे. यावेळी हे संकट इतकं मोठं आहे की फक्त मेटा नाही, तर भविष्यात सर्वच टेक कंपन्यांपुढची आव्हानं वाढणार असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर यामुळं परिणाम होताना दिसणार आहे.
(Meta CEO Mark Zuckerberg ) मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग सध्या एका कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जात असून, अमेरिकेच्या न्यायालयासमोर एका अशा प्रकरणात ते लढत आहे जिथं त्यांच्यावर इन्स्टाग्राम (Instagram ) आणि व्हॉट्सअप (WhatsApp ) यांसारख्या कंपन्या खरेदी करत प्रत्यक्षातील स्पर्धात संपवल्याचा आरोप लावम्यात आला आहे.
तर, न्यायालयापुढं झुकरबर्ग यांना नमतं घ्यावं लागणार…
न्यायालयानं जर मेटाच्या विरोधात निकाल दिला तर, कायद्यापुढं झुकरबर्ग यांना नमतं घ्यावं लागणार असून, त्यांना ही दोन्ही समाजमाध्यमं अर्थात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मालकी सोडावी लागणार आहे.
प्रकरण समजून घ्या…
अमेरिकेच्या Federal Trade Commission (FTC) नं मेटावर गंभीर आरोप करत त्यांनी आपल्या स्पर्धकांना संपवत सोशल मीडिया क्षेत्रावर एकाधिकारशाही सुरू केली आहे. FTC च्या मते Meta नं जाणीवपूर्वक Instagram आणि WhatsApp ची खरेदी केली असून, एक प्रकारे स्पर्धा संपवत या क्षेत्रात आपलं अधिपत्य प्रस्थापित केलं आहे. आजच्या घडीला सोशल मीडिया क्षेत्रात मेटाचा सर्वात मोठी भागिदारी असून, FTC च्या मते आता नेटकऱ्यांमध्ये निवड करण्यासाठीसुद्धा फारसे पर्याय उरलेले नाहीत.
Zuckerberg म्हणतात…
सदर गंभीर आरोपांवर आपली बाजू मांडताना न्यायालयापुढं सादर होत Mark Zuckerberg यांनी आपण या माध्यमांचे हक्क खरेदी करण्यामागे त्यांची कार्यक्षमता आणखी उत्तम करत युजर्सना आणखी चांगला अनुभव देण्याचाच मुख्य हेतू होता. इथं कुठंही स्पर्धा संपवण्याचं लक्ष्य नव्हतं, आजही युजर्सना त्यांच्या आपल्या माणसांशी जोडणं हाच मेटाचा मुख्य हेतू असून, या माध्यमातून फक्त मित्रच जोडले जात नाहीत तर, नेटकऱ्यांना आपल्या आवडीचा कंटेंटसुद्धा बसल्या जागी प्राप्त होतो असं त्यांनी स्पष्ट केलं.
एकिकडे झुकरबर्ग यांनी आपली बाजू मांडलेली असतानाही दुसरीकडे मात्र एफटीसीनं त्यांच्या विरोधात निकाल दिल्यास त्यांना या माध्यमांच्या मालकीवर पाणी सोडावं लागू शकतं. ज्यामुळं जगातील या श्रीमंत व्यक्तीला आता कायद्यापुढं नमतं घ्यावं लागतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, या खटल्याची सुनावणी जवळपास 8 महिने सुरू राहणार असून, यामध्ये Meta च्या माजी सीईओ COO Sheryl Sandberg आणि Instagram चे सहसंस्थापक Kevin Systrom यांसारख्या बड्या व्यक्तीमत्त्वांची साक्षसुद्धा घेतली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सौ.झी.न्यूज.

































