Homeमनोरंजनक्रिकेट असोसिएशनने रोहितला दिला विशेष सन्मान! आता वानखेडे स्टेडियममध्ये नेहमीच दिसणार शर्माजीचे...

क्रिकेट असोसिएशनने रोहितला दिला विशेष सन्मान! आता वानखेडे स्टेडियममध्ये नेहमीच दिसणार शर्माजीचे नाव

क्रीडा : मुंबई क्रिकेट असोसिएशन: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी आयपीएल सोडता करियरचा गेल्या काही काळ खूप चांगला गेला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T-२० वर्ल्ड आणि चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. याशिवाय, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने 50 षटकांच्या विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम सामने खेळले. एवढंच नाही तर रोहितच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स संघासाठी 5 आयपीएल जेतेपदेही जिंकली आहेत. अशा परिस्थितीत आता मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएने रोहितचा सन्मान एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमसीएने रोहितबद्दल केली मोठी घोषणा

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा विद्यमान कसोटी कर्णधार रोहित शर्मासाठी एक खास गोष्ट करणार आहे असे सांगितले. रोहित शर्मा, माजी कर्णधार अजित वाडेकर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावार एक-एक स्टँडला नाव दिले जाणार आहे. एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

कोणता स्टँड होणार आहे रोहितच्या नावी?

मंजूर झालेल्या ठरावानुसार, दिवेचा पॅव्हेलियनचा तिसरा मजला आता रोहित शर्मा स्टँड म्हणून ओळखला जाईल, ग्रँड स्टँडचा तिसरा मजला आयसीसीचे माजी अध्यक्ष पवार यांच्या नावावर असेल आणि ग्रँड स्टँडचा चौथा मजला वाडेकर यांच्या नावावर असेल.

अजित वाडेकर यांनाही देण्यात आली आदरांजली

अजित वाडेकर हे क्रिकेट जगतातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. अजित यांनी 1966 ते 1974 या काळात 37 कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले. एवढच नाही तर 1971 मध्ये अजित यांनी भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिले. ऑगस्ट 2018 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी अजित वाडेकर यांचे निधन झाले.

रोहितचा सन्मान

2013 मध्ये कसोटी पदार्पण करणारा रोहित अनेक महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. आता रोहितला त्याच्या घरच्या वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावावर एक स्टँड होणार आहे. 2022 मध्ये कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, रोहितने 2024 मध्ये भारताला T-20 विश्वचषक आणि या वर्षी मार्चमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. या स्पर्धा जिंकणे फार महत्त्वपूर्ण गोष्ट होती. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!