Homeमहाराष्ट्रWife dies on the spot in accident, husband and two others seriously...

Wife dies on the spot in accident, husband and two others seriously injured near Bhandara | भंडाऱ्याजवळ चारचाकीचा भीषण अपघात: दुभाजकाला धडकून कार पलटली, पत्नीचा जागीच मृत्यू तर पतीसह दोघे गंभीर जखमी – Nagpur News


भंडारा येथील पाचगावजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नागपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले

?

या घटनेची अधिकची माहिती अशी, नातलगाकडील लग्नकार्य आटोपून नागपूरला परत जात असताना पाचगाव जवळील कुही फाट्यावर झालेल्या चारचाकीच्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पतीसह अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना 14 एप्रिल, सोमवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान घडली आहे. अपघातग्रस्त भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहली येथील रहिवासी असून येथील कृष्णा फर्निचर मार्टचे मालक कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम कृष्णा शेंडे वय (२६) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. कृष्णा शेंडे त्यांची तीन वर्षाची मुलगी देवाशी तर साळा हेमंत असे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

कृष्णा शेंडे हा आपल्या परिवारासह त्यांच्या नागपूर येथील नातलगांच्या लग्नसभारंभास गेले होते. नागपूर येथून ब्रम्हपुरी येथे लग्नकार्य आटोपून सोमवारी रात्री परत नागपूरला स्वतःच्या चारचाकी वाहनाने जात असताना पाचगाव जवळील कुही फाट्यावरील उड्डाण पुलावर अचानक चारचाकी वाहन दुभाजकाला आदळल्याने पलटी मारली. यात कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम शेंडेचा जागीच मृत्यू झाला. तर स्वतः कृष्णा शेंडे अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!