Homeदेश-विदेशआंबेडकर जयंती 2025 डॉ. आंबेडकरांनी भारतात कामगार कायदे सुधारित केले

आंबेडकर जयंती 2025 डॉ. आंबेडकरांनी भारतात कामगार कायदे सुधारित केले

डॉ. आंबेडकरांनी भारतातील कामगार कायदे सुधारित केले: संपूर्ण देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या  जयंतीचा उत्साह पहायला मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अफाट आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे फक्त दलितच नाही तर सर्व समाजातील कामगारांना काद्याचे संरक्षण मिळाले आहे. किमान वेतन, महागाई भत्ता, भर पगारी रजा, बोनस, आठ तास कामाचा दिवस, मध्यान्ह जेवणाची सुट्टी, अतिरिक्त कामासाठी दुप्पट दराने वेतन, आठवड्याची सुट्टी, असे अनेक दैनंदिन जीवनाशी निगडित अधिकार भारतामधील कामगारांना व कर्मचार्‍यांना मिळेत आहेत ते फक्त एका काद्यामुळे.  कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देणारा हा कायदा आहे कामगार कायदा.

कामगार काद्यामुळेच कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत आहे. कुशल किंवा अकुशल कर्मचारी नुसार किमान वेतन बदलते.  2017 मध्ये, महिलांसाठी उपलब्ध सशुल्क प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली. जर एखाद्या महिलेने गेल्या 12 महिन्यांत 80 दिवसांपेक्षा जास्त काळ एखाद्या संस्थेत काम केले असेल, तर त्या महिलेा सशुल्क प्रसुती रजेचा लाभ मिळतो.  3 महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेतले असल्यास, दत्तक घेतल्याच्या तारखेपासून 12 आठवड्यांच्या सशुल्क प्रसूती रजेसाठी देखील अर्ज करता येतो. सरोगेट मदर असलेल्या महिलेला मुलाच्या जन्माच्या दिवसापासून 12 आठवड्यांची प्रसूती रजा मिळते. मालकाने किंवा कंपनीने परस्पर सहमती दर्शवल्यास 26 आठवड्यांचा रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला घरूनही काम करू शकतात.

एखाद्या कंपनीने दर महिन्याला उशीर पगार दिल्यास पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, 1936 नुसार केल्यास मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. समान मोबदला कायद्याअंतर्गत महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळते. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ झाल्यास लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा 2013 मध्ये लागू करण्यात आला. कर्माचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करुन भविष्य निर्वाह निधी कायदा बनवण्यात आला.  या कायद्याचा उद्देश कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची बचत करणे हा आहे. कर्मचारी राज्य विमा योजना  ही भारत सरकारद्वारे प्रदान केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी नोकरीवर असताना झालेल्या दुखापती, आजारपण किंवा प्रसूतीच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळते.

1965 नुसार, कंपन्यांना वैधानिक बोनस देणे बंधनकारक आहे. बोनसची किमान मर्यादा 8.33% आहे, म्हणजेच तुमच्या कंपनीने तुम्हाला तुमच्या वेतनाच्या 8.33% इतका किमान बोनस देणे आवश्यक आहे. एखाद्या कंपनीत पाच वर्षांहून अधिक काळ काम केले असेल आणि सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर कंपनीत काम केलेल्या प्रत्येक वर्षासाठी 15 दिवसांची ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार आहे.(सौ.झीन्यूज)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!