Homeदेश-विदेशअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दर युद्धाच्या तुलनेत उदव ठाकरे शिवसेना पंतप्रधान मोदी...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दर युद्धाच्या तुलनेत उदव ठाकरे शिवसेना पंतप्रधान मोदी येथे खोदतात


ट्रम्प टॅरिफ युद्धाच्या वेळी यूबीटी यूबीटी मोदी: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे जगभरात सुरु झालेल्या ‘टॅरिफ युद्धा’वरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाब्दिक चिमटे काढले आहेत. ट्रम्प यांचं धोरण अमेरिकेतील नागरिकांना कसं चिंतेत टाकणार आहे याबद्दल बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यामधील साम्यही सांगितलं आहे.

पूर्वी नव्हता एवढा प्रचंड पैसा

“प्रेसिडंट डोनाल्ड ट्रम्प हे विचारी राज्यकर्ते म्हणून कधीच परिचित नव्हते. एककल्ली आणि विक्षिप्त राजकारणी असाच त्यांचा बदलौकिक आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या टर्ममध्ये त्याचा अनुभव आला होता. आता दुसऱ्या टर्ममध्ये तर त्यांच्या अविचारी धोरणांनी उच्छाद मांडला आहे,” असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं टॅरिफ प्रकरणावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. “संपूर्ण जगात त्याविरोधात संताप आहे. खुद्द अमेरिकेतही तेथील जनता ट्रम्पविरोधात रस्त्यावर उतरली. मात्र एवढे सगळे असूनही ट्रम्प महाशय आपल्या आर्थिक धोरणांचे खुले समर्थन करीत आहेत. आपण सुरू केलेल्या ‘टॅरिफ युद्धा’त अमेरिकेचीच कशी सरशी होत आहे, पूर्वी नव्हता एवढा प्रचंड पैसा कसा अमेरिकन सरकारच्या तिजोरीत येत आहे, अशा वल्गना ते करीत आहेत,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

त्यावर ट्रम्प महाशय ‘ब्र’देखील काढणार नाहीत

“ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला रोजची दोन अब्ज डॉलर्सची कमाई होत आहे. जी याआधी कधीच झाली नव्हती. या वाढीव उत्पन्नाचे विवरण आणि कुठल्या टॅरिफमुळे किती उत्पन्न वाढले याचा तपशील अर्थातच ट्रम्प यांनी दिलेला नाही. मात्र आपल्या धोरणांमुळे अमेरिकेचे आर्थिक नुकसान होत नसून फायदाच होत आहे असे रस्त्यावर उतरलेल्या अमेरिकन जनतेला भासविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे उघड आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धामुळे आणि इतर आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेचा काही प्रमाणात आर्थिक फायदा होणार हे उघड आहे. कारण तब्बल 60 देशांविरोधात या महाशयांनी टॅरिफ लादला आहे. त्यामुळे त्या प्रमाणात अमेरिकेचे उत्पन्न वाढणार हे उघडच आहे. मात्र टॅरिफ युद्धाची झळ बसलेल्या देशांनी बदललेल्या त्यांच्या आयात कर धोरणामुळे अमेरिकादेखील दररोज अब्जावधी डॉलर्स गमावतच आहे. जे लाखो डॉलर्स एरवी मिळू शकले असते त्यावर अमेरिकेला पाणी सोडावे लागत आहे. मात्र त्यावर ट्रम्प महाशय ‘ब्र’देखील काढणार नाहीत. कारण ते कबूल करणे म्हणजे स्वतःच्या चुकीची कबुली देण्यासारखेच आहे. म्हणून रोजच्या दोन अब्ज डॉलर्स कमाईचे तुणतुणे ते वाजवीत आहेत,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

कुठलाही एककल्ली सत्ताधारी त्याचेच…

“चीनसह इतर अनेक देशांनी अमेरिकेला होणारी निर्यात कमी केली आहे किंवा रोखली आहे. त्याचे मूल्यदेखील अमेरिकेसाठी अब्जावधी डॉलर्सच आहे. टॅरिफ युद्धामुळे अमेरिकेच्याही शेअर बाजारावर परिणाम झाला आहेच. अमेरिकेचा विकास दर घसरणार, असा इशाराही तज्ञांनी दिला आहे. अमेरिकेतील महागाईच्या बातम्या तेथील आर्थिक-सामाजिक संकटाची जाणीव करून देत आहेत. अंड्यांपासून सोयाबीनपर्यंत अनेक पदार्थ आणि वस्तूंचे दर नजीकच्या भविष्यात प्रचंड वाढणार, हे निश्चित आहे. मात्र ते गांभीर्याने घेण्याऐवजी ट्रम्प महाशय कान पाडून बसले आहेत आणि आपल्याच ‘नंदनवनात’ मग्न आहेत. कुठलाही एककल्ली सत्ताधारी त्याचेच धोरण देशासाठी कसे भल्याचे आहे, असे तुणतुणे वाजवीत असतो. या धोरणाचे देशाला भोगावे लागणारे दुष्परिणाम, त्यामुळे तेथील आर्थिक-सामाजिक घडी विस्कटण्याचा असलेला धोका एकतर त्यांना मान्य नसतो किंवा त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सध्या हेच सुरू आहे,” असं निरिक्षण ठाकरेंच्या पक्षाने नोंदवलं आहे.

हे ‘सत्य’ ते अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवत आहेत

“जगावर आपण लादलेल्या टॅरिफ युद्धामुळे अमेरिकेचे रोजचे उत्पन्न कसे दोन अब्ज डॉलर्स वाढले, असे ‘अर्धसत्य’ प्रेसिडंट ट्रम्प सांगत आहेत. मात्र टॅरिफ युद्धाची झळ पोहोचलेल्या चीनसह इतर देशांनी दिलेल्या ‘ईट का जवाब पत्थर’मुळे अमेरिकेचा खर्च किती अब्जांनी वाढला, किती संभाव्य उत्पन्नावर अमेरिकेला पाणी सोडावे लागले, अमेरिकन उद्योग-व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत, विकास दर घटण्याची धोक्याची घंटा…; हे ‘सत्य’ ते अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवत आहेत. कारण ते सांगणे त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे,” असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.

मोदींवर साधला निशाणा

“भारतात जे पंतप्रधान मोदी करीत आले आहेत, तेच प्रेसिडंट ट्रम्प अमेरिकेत करीत आहेत. सोयीचे तेवढे बोलायचे आणि गैरसोयीचे झाकून ठेवायचे. त्यावर ‘मौनीबाबा’ व्हायचे. दोघेही त्याअर्थाने ‘असत्या’चे वारसदार आहेत. बहुदा त्यामुळेच मोदी हे ट्रम्प यांचे ‘जवळचे मित्र’ असावेत आणि मोदीही ट्रम्प भारताला देत असलेल्या तडाख्यांबाबत अवाक्षर काढत नसावेत,” असा खोचक टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!