Homeदेश-विदेशएक व्यावसायिकाने पत्नीला ठार मारले आणि दिल्लीतील नाल्यात मृत शरीर फेकले

एक व्यावसायिकाने पत्नीला ठार मारले आणि दिल्लीतील नाल्यात मृत शरीर फेकले

दिल्लीमध्ये महिन्याभरापूर्वी गटारात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे फक्त महिलेच्या नाकातील पिनच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी महिलेचा पती अनिल कुमार याला अटक केली आहे. अनिल कुमार व्यावसायिक असून, त्यानेच पत्नीची हत्या करुन मृतदेह गटारात फेकल्याचा संशय आहे.

15 मार्च रोजी पोलिसांना गटारात मृतदेह आढळला होता. हा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळलेला होता. तसंच त्याला दगड आणि सिमेंटचं पोतं बांधण्यात आलं होतं. पोलिसांनी नाकातील नथीच्या आधारे महिलेची ओळख पटवली. यामुळे या गुन्ह्याचा उलगडा करण्यात त्यांना मदत मिळाली.

त्या नथीच्या आधारे पोलीस दक्षिण दिल्लीतील एका दागिन्यांच्या दुकानात पोहोचलेय तिथे रेकॉर्ड तपासल्यावर ही नथ गुरुग्राममधील एका फार्महाऊसमध्ये राहणाऱ्या दिल्लीतील प्रॉपर्टी डीलर अनिल कुमारने खरेदी केली असल्याचं समजलं. बिल त्याच्या नावाने जारी करण्यात आलं होतं. महिलेची ओळख पटली असून, तिचं नाव सीमा सिंग आहे. ती 47 वर्षांची होती.

यानंतर पोलीस कुमारच्या घऱी पोहोचले. चौकशी केली असता सीमा सिंग त्याची पत्नी असल्याचं समजलं. पोलिसांनी कुमारकडे सीमाशी बोलायचं आहे अशी विनंती केली असता, त्याने ती फोन न घेता वृंदावनला गेली असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांना संशय आला.

पोलीस कुमारच्या द्वारका येथील कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी डायरीत सासूचा नंबर मिळाला. सासूशी संपर्क साधला असता सीमा सिंग यांची बहिण बबिताने 11 मार्चपासून आपलं तिच्याशी काहीच बोलणं झालं नसल्याचं सांगितलं. सीमा सिंग यांचं कुटुंबही चिंतेत होतं.

बबिताने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा त्यांनी कुमारशी संपर्क साधला तेव्हा त्याने सीमा जयपूरमध्ये असून बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याचं सांगितलं. तिने सांगितले की त्याने त्यांना आश्वासन दिलं होतं की जेव्हा तिला बरं वाटेल तेव्हा तो तिला त्यांच्याशी बोलायला लावेल. हे अनेक दिवस चालू राहिले. सीमा सिंग यांच्या कुटुंबाने सांगितलं की त्यांना पोलिसांकडे जायचं होतं पण कुमारच्या आश्वासनामुळे ते वाट पाहत होते.

1  एप्रिलला कुटुंबाला एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं. यावेळी हा मृतदेह सीमा सिंग यांचाच असल्यावर शिक्तामोर्तब झालं. दुसऱ्या दिवशी, तिच्या मोठ्या मुलानेही तो मृतदेह तिच्या आईचा असल्याचे ओळखलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देऊन कुटुंबाने सांगितलं की, सीमा सिंग यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्यांनी असाही दावा केला की फक्त कुमार आणि सिंग यांच्याकडेच त्यांच्या द्वारकेतील घराच्या चाव्या होत्या. कुमार आणि त्याचा सुरक्षारक्षक शिव शंकर यांना अटक करण्यात आली आहे.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

भाजप नेत्याची मुलगी म्हणाली- जोशींना शिक्षणमंत्री बनवणे हा विनोद:यूपीमध्ये वडील आमदार होते; CJP आंदोलनात...

0
जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात छेडछाडीचा दावा करणाऱ्या यशस्वी राजे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. यशस्वी यांनी...
spot_img

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...
error: Content is protected !!