Homeदेश-विदेशGoogle Lays Off 2025: गुगलने एकाचवेळी शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ, 'या' विभागाला...

Google Lays Off 2025: गुगलने एकाचवेळी शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ, ‘या’ विभागाला बसला मोठा फटका!

गूगल 2025 बंद करते: सध्या जगभरात एआयचा शिरकाव झालाय. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये एआय आपली पकड मजबूत करताना दिसतंय. दुसरीकडे जागतिक मंदीच्या झळा कर्मचाऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. दिग्गज कंपन्या तडकाफडकी कर्मचारी कपात करत आहेत.  अल्फाबेटच्या गुगलने त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइस युनिटमधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. यामुळे एकाचवेळी शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पाहायला मिळतेय.

गेल्या काही काळापासून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कपात होतेय. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळतंय. असे असताना  गुगलने कपात केलेले हे कर्मचारी अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल फोन आणि क्रोम ब्राउझरवर काम करत होते. कंपनीची पुनर्रचना आणि खर्च कपात यामुळे नोकऱ्यांमध्ये कपात झाल्याचा दावा अलिकडच्या एका अहवालात करण्यात आलाय.

जानेवारीपासून स्वेच्छा एक्झिट प्रोग्राम सुरु

गुगलने जानेवारी 2025 मध्ये या युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक एक्झिट प्रोग्राम सुरू केला होता. हा कार्यक्रम अमेरिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होता. अँड्रॉइड आणि पिक्सेल टीमच्या विलीनीकरणानंतर कंपनीच्या ध्येयांनुसार काम करू शकले नाहीत, त्या कर्मचाऱ्यांना कंपनी सोडण्याची संधी मिळावी यासाठी हा प्रोग्राम सुरू करण्यात आला. ज्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याला सेव्हरन्स पॅकेज देखील दिले गेले.

गुगलकडून कपातीची अधिकृत घोषणा नाही

खर्च कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपनीच्या सीईओचे हे एक धोरणात्मक पाऊल असू शकते असे मानले जाते. असे अस गुगलने अद्याप अधिकृतपणे सांगितले नाही की ही कपात कोणत्या क्षेत्रांवर केंद्रित आहे आणि किती कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे.

एचआर आणि क्लाउड विभाग अडचणीत

यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये गुगलने त्यांच्या एचआर आणि क्लाउड विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यावेळीही, कंपनीने खर्च कमी करण्याच्या आणि एआय क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे सांगण्यात आले होते.

14 आठवड्यांच्या पगार देऊन काढले

कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक नोकरीतून बाहेर पडण्याचा कार्यक्रम मार्च 2025 पासून सुरू करण्यात आला. ज्यामध्ये वरिष्ठ आणि मध्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर 14 आठवड्यांच्या पगाराचे पॅकेज आणि काम केलेल्या वर्षांच्या संख्येसाठी अतिरिक्त एक आठवडा देण्यात आला. यासोबतच क्लाउड विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले. यामध्ये सेल्स ऑपरेशन, कस्टमर एक्सिपिरियन्स आणि गो-टू-मार्केट विभागांचा समावेश आहे.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

भाजप नेत्याची मुलगी म्हणाली- जोशींना शिक्षणमंत्री बनवणे हा विनोद:यूपीमध्ये वडील आमदार होते; CJP आंदोलनात...

0
जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात छेडछाडीचा दावा करणाऱ्या यशस्वी राजे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. यशस्वी यांनी...
spot_img

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...
error: Content is protected !!