Homeदेश-विदेशब्रेकिंग न्यूज ताहववार राणा 26 नोव्हेंबर मुंबईने अमेरिकेकडून निया कोठडी प्रत्यार्पणावर प्रथम...

ब्रेकिंग न्यूज ताहववार राणा 26 नोव्हेंबर मुंबईने अमेरिकेकडून निया कोठडी प्रत्यार्पणावर प्रथम प्रतिक्रिया दिली

आमच्याकडून तहववार राणा प्रत्यार्पणः 26/11 मुंबई हल्ल्यामध्ये जवळपास 174 निष्पापांचा बळी गेला आणि या मृत्यूचं थैमान पाहून एका काळीज नसलेल्या क्रूरकर्म्यानं हसत व्यक्त होणं पसंत केलं होतं, तो म्हणजे या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा. अनेक प्रयत्नांनंतर अखेर मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भ्याज हल्ल्याचा कट रचणाऱ्या या तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी रात्री पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर करण्यात आलं.

राणा भारतात आला आणि…

विमानतळावर आल्यानंतर राणाला जवळपास अडीच तासानंतर न्यायालात आणण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली. राणाच्या कोठडीची कारणंही वकिलांनी कोर्टासमोर मांडली. शिवाय राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसाची कोठडी दिली. सदर सुनावणीच्या वेळी कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया…

तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर अमेरिकेनंही पहिली प्रतिक्रिया देत या लढ्यातील आपली भूमिका स्पष्ट केली. 9 एप्रिल रोजी आपल्या देशातून राणाला संपूर्ण प्रक्रियेसह भारताच्या ताब्यात देण्यात आलं असं सांगताना दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्र तत्पर आणि कटिबद्ध असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

अमेरिकेच्या वतीनं टॅमी ब्रूस यांनी ही प्रतिक्रिया वृत्तसंस्थेला देत अमेरिकेनं कायमच दहशतवादाशी लढण्याच्या भारताच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं. ‘जसं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात, अमेरिका आणि भारत ही दोन्ही राष्ट्र जागतिक स्तरावर दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी सदैव एकत्र काम करत राहतील. ‘तो’ (राणा) त्यांच्या ताब्यात असून, आमच्यासाठी ही बाब अतिशय अभिमानाची आणि महत्त्वपूर्ण आहे’, असं ही ब्रूस यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान एनआयएकडून आता राणाची सातत्यानं चौकशी केली जाणारस असून, 26/11 हल्ल्याशी संबंधित इतर सर्व गोष्टी आणि गुपितं उघड केली जाणार आहे. यंत्रणांनी तशी तयारीच केली असून, या चौकशीतून लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तनातील दहशतवाद्यांच्या तळांसह त्यांची कटकारस्थानं यामुळं उघड्यावर पडतील असा विश्वासही व्यक्त केला जात आहे


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NEET पेपर लीक | महाराष्ट्र, राजस्थान सीबीआयने पालकांची यादी केली

0
जयपूर/मुंबई/बंगळूरु/पाटणा25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर...

22 मे राशिभविष्य:वृषभ राशीचे लोक मालमत्तेत गुंतवणुकीची योजना बनवू शकतात, मीन राशीच्या लोकांचे उत्पन्न...

0
शुक्रवार, 22 मे रोजी मेष राशीच्या लोकांना मीडिया किंवा फोनद्वारे व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे मनासारखे परिणाम मिळतील...

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

इंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर:गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख, यंदा 70...

0
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा फटका जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पर्यटनाला बसला आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात...
spot_img

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
error: Content is protected !!