Homeदेश-विदेशतहववार राणा प्रत्यार्पणाचे प्रमुख संदीप उन्नीकृष्णन म्हणतात की त्याचा मुलगा 26 11...

तहववार राणा प्रत्यार्पणाचे प्रमुख संदीप उन्नीकृष्णन म्हणतात की त्याचा मुलगा 26 11 मुंबई हल्ला बळी पडला नाही

तहववार राणा प्रत्यार्पण: मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (National Security Guard) मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या वडिलांनी तहव्वूर राणाचं भारतात होणारं प्रत्यार्पण हे राजनैतिक यश नसून, सर्वसामान्य लोकांसाठी घेतलेला बदला असल्याची भावना व्यक्त केली आहे. एनडीटीव्हीशी फोनवर बोलताना के उन्नीकृष्णन म्हणाले की, राणाच्या प्रत्यार्पणामुळे गुन्हा सिद्ध होत नाही आणि 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली यालाही परत आणण्याची गरज आहे.

मुंबईत दहशतवादी ताजमहल हॉटेलमध्ये घुसल्यानंतर 31 वर्षीय मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी 10 कमांडोंच्या टीमचं नेतृत्व केल होतं. हॉटेलमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी कमांडोंच्या पथकावर गोळीबार केला होता. मेजर उन्नीकृष्णन यांनी त्यांच्या जखमी सहकाऱ्यांना बाहेर काढलं आणि एकट्याने दहशतवाद्यांचा पाठलाग केला. हॉटेलच्या उत्तरेकडील भागात दहशतवाद्यांना अडकवण्यात ते यशस्वी झाले. दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत ते मारले गेले. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शेवटच्या क्षणी “वर येऊ नका, मी त्यांना हाताळेन” असं सांगितलं होतं.

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. “मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी सौहार्द आणि सर्वोच्च दर्जाचे नेतृत्व याशिवाय सर्वात उल्लेखनीय शौर्य दाखवले आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले,” असं प्रशस्तिपत्रात म्हटलं आहे.

16 वर्षांनी शहीद संदीप यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शौर्याबद्दल भाष्य करताना म्हटलं आहे की, “संदीप हा 26/11चा पीडित नाही. तो एक सुरक्षा कर्मचारी होता ज्याने मृत्यूला तोंड देत आपले कर्तव्य चोख बजावलं. त्याला खात्री होती की तो परत येणार नाही. जर त्याने मुंबईत हे केलं नसतं तर दुसरीकडे कुठेतरी केले असते. आपली मुख्य चिंता असा हल्ला रोखण्याची असली पाहिजे, जेणेकरून आपण या लोकांना होणारे नुकसान कमी करू शकू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे काही समाधान झालं का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “नक्कीच हे यश आहे. सर्वसामान्यांसाठी हे फक्त राजनैतिक यश नाही तर बदल आहे. आपण गुन्हेगाराला पकडू शकतो”.

राणाला ताब्यात घेण्यात भारताला मिळालेल्या यशामुळे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 166 पीडितांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल का? या प्रश्नावर ते म्हणाले, “यामुळे सगळं काही संपत नाही. आपल्याला कोलमन हेडलीला पकडावे लागेल. हे सर्व प्यादे आहेत, जे पैशासाठी काम करत आहेत. आपल्या शेजारील काही एजन्सींच्या इशाऱ्यावर हे काम करण्यात आलं. परंतु त्यामागे असणारे मेंदू, जरी सर्व काही संशयापलीकडे सिद्ध केले असले तरी आम्ही अद्याप त्यांना स्पर्श केलेला नाही. परंतु हे निश्चितच एक यश आहे, जरी उशीर झाला तरी. आणि मला आशा आहे की सर्वांना शिक्षा होईल.”

राणाला परत आणणारे एक विशेष विमान आज दुपारी दिल्लीत उतरण्याची शक्यता आहे. त्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी त्याची चौकशी करतील. एनआयए प्रत्येक गोष्टीची तपासणी करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “हा (राणा) प्रशिक्षित आहेत. एनआयएकडे सगळी माहिती आहे, ते फक्त त्याची वाट पाहत आहेत. आता त्यातून काय बाहेर येतं ते पाहूयात”.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!