Homeपुणे / पिंपरी-चिंचवडसचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर !

सचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर !

ब्रेकिंग न्यूज
25 ऑक्टोबरचे टॅरो राशिफळ:वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतीलशनिवारचे टॅरो राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना बढती, नवीन करार मिळू शकतो, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या नोकरदारांना चांगला दिवसबुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यतारविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत मिळेलहिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा !नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म विषयी ग्रंथप्रदर्शनाची अमूल्य पर्वणी !देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहनश्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius gemini cancer singh rashi meen libra leo aries taurus kanya scorpio and other signsउजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य सचिवांना समन्स !

… हा तर सत्याचा विजय ! – सनातन संस्था

     मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले हिंदुत्वनिष्ठ सचिन अंदुरे यांना तपासातील गंभीर त्रुटी लक्षात घेऊन आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरोधात अंदुरे यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. अंदुरे यांच्या या याचिकेला विरोध करत दाभोलकर परिवाराने ‘सचिन अंदुरे यांना जामीन देऊ नये’, अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी स्पष्टपणे धुडकावून लावत अंदुरे यांना जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे सनातन संस्थेवर आणि हिंदुत्वनिष्ठांवर खोटे आरोप करून त्यांना गोवण्याचे दाभोलकर कुटुंबियांचे षड्यंत्र आता उघडे पडले आहे; तसेच तपास यंत्रणांचा फोलपणाही उघड झाला असून हा सत्याचा मोठा विजय आहे, अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मांडली आहे.

     उच्च न्यायालयामध्ये सचिन अंदुरे यांच्या जामिनासाठी युक्तिवाद करतांना ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान यांनी पुराव्यांमधील त्रुटींवर बोट ठेवले. सीबीआयसारख्या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेने या प्रकरणात कोणतीही ‘ओळख परेड’ घेतली नव्हती. काहींनी सचिन अंदुरे यांना गोळ्या झाडतांना पाहिल्याचा दावा केला, तर काहींनी ते घटनास्थळी नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात मोठी तफावत होती. या, तसेच तपासातील अशा प्रकारच्या अनेक त्रुटी अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. हे सर्व लक्षात घेऊन न्यायालयाने हा जामीन मंजूर केला व शिक्षेला स्थगिती दिली आहे. यापूर्वी याच प्रकरणात एप्रिल महिन्यात हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला होता.

या विषयी श्री. वर्तक पुढे म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येनंतर कोणत्याही ठोस पुराव्याविना केवळ वैचारिक द्वेषातून सनातन संस्थेला लक्ष्य करण्यात आले. दाभोलकर कुटुंबियांनी ‘विशिष्ट विचारसरणीचा आवाज दाबण्याचा कट’ असल्याचा कांगावा करत सनातनवर बेछूट आरोप केले; परंतु विशेष न्यायालयाने यापूर्वीच डॉ. वीरेंद्र तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे या तीन हिंदुत्वनिष्ठांची निर्दोष मुक्तता केली होती. यामुळे दाभोलकर कुटुंबाचा न्यायालयात सपशेल पराभव झाला आहे. खऱ्या खुन्यांचा शोध घेण्यापेक्षा हिंदुत्ववाद्यांना अडकवण्याचाच त्यांचा हेतू होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

      तसेच सचिन अंदुरे यांना अटक झाली तेव्हा त्यांची मुलगी केवळ ६ महिन्यांची होती. आता सचिन अंदुरे आपल्या मुलीला भेटतील तेव्हा ती आठ वर्षांची झाली आहे. सचिन अंदुरे यांना मुलीचे ते बालपण पुन्हा मिळणार नाही. त्यांची मुलगी वडिलांच्या ज्या सहवासाला मुकली, तो सहवास तिला पुन्हा मिळणार नाही. मोठमोठे राजकारणी, पोलीस अधिकारी, सिनेकलावंत यांच्याशी जवळीक असलेल्या कुटुंबासाठी एका निष्पाप हिंदू मुलाचा कसा बळी दिला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सचिन अंदुरे! न्यायालयात अंदुरे यांच्या बाजूने लढा देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्त्या सिद्धविद्या, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि त्यांच्या सर्व सहयोगी अधिवक्त्यांचे सनातन संस्था मनःपूर्वक आभार व्यक्त करते. अंतिम सुनावणीत हे दोन्ही हिंदुत्वनिष्ठ युवक निर्दोष मुक्त होतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

25 ऑक्टोबरचे टॅरो राशिफळ:वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे...

0
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना बढती, नवीन करार मिळू शकतो, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या...

0
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या नोकरदार लोकांना बढतीचे योग आहेत. वाणिज्य क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन करार, तर फ्रीलान्सर्सना नवीन प्रकल्प मिळू शकतो....

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!