Homeमहाराष्ट्रमराठा इतिहासाच्या विकृतीवरून जयंत पाटील यांनी धर्मेंद्र प्रधान यांची निंदा केली

मराठा इतिहासाच्या विकृतीवरून जयंत पाटील यांनी धर्मेंद्र प्रधान यांची निंदा केली


नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाट

.

जयंत पाटील म्हणाले की, “नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. पोलिसांचा लाठीचार्ज सहन करत जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या लढ्यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा मोठा विजय आहे.”

भाजपकडून ‘सिम्पथी’ निर्माण करण्याचा प्रयत्न

धमेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांकडून सुरू असलेल्या सोशल मीडिया मोहिमेवर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. “प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्र आणि राज्यातील अनेक भाजप नेते तसेच सत्ताधारी लोकप्रतिनिधी सोशल मीडियावर धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडत आहेत. प्रधान यांच्यावर अन्याय झाला किंवा त्यांनी चांगले काम करूनही राजीनामा द्यावा लागला, असा माहोल निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

प्रधानांच्या काळात मराठा इतिहासाशी छेडछाड

जयंत पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातील बदलांचा मुद्दा उपस्थित केला. “धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून इ.स. १७५९ मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्यात आला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जोडलेल्या मराठा इतिहासाशी छेडछाड करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले,” असा आरोप त्यांनी केला.

मराठ्यांचा इतिहास पुसू पाहणाऱ्यांना धडा

“या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकडे केवळ एका मंत्र्याच्या पदत्यागाच्या दृष्टीने न पाहता, मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही हा धडा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा…

धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता:पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला थेट ‘घरचा आहेर’ दिला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर देशात लाठीचार्ज अन् संतापाची लाट पसरली नसती,” अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. सविस्तर वाचा…

राहुल गांधींना पंतप्रधान निवासावर घातपात घडवायचा होता:महाराष्ट्राने नाकारलेले लोक दिल्लीत जाऊन आगीत तेल ओतत होते – एकनाथ शिंदे

‘नीट’ परीक्षा घोटाळा ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ कठोर पावले उचलली आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी उद्या संसदेत नवा कायदा मांडला जाणार असून, त्यात १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद असणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे मूळतः अराजकीय होते; मात्र राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील पराभूत नेत्यांनी देशात बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखी अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनाचा राजकीय वापर केला, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट

0
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...

कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार:तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदवावी, सहकार आयुक्तांचे स्पष्टीकरण

0
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने...
spot_img

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...
error: Content is protected !!