शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आणि देशाच्या राजकारणातील ‘पुराण पुरुष’ आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकून विचार केला असला, तरी सरकारला खरा धक्का जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानेच दिला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीमुळे देशभरात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कायद्याच्या राज्यात आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे याप्रकरणी पंतप्रधानांपासून ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. फडणवीस शिक्षणमंत्री होणार संजय राऊत म्हणाले की, जोशी हे फक्त कोळसामंत्री म्हणून चांगले काम करू शकतात. नवीन मंत्री आल्यावर कालचा गोंधळ बरा होता असे म्हणायची वेळ येईल. त्यांना नीट म्हणजे काय, हे आधी विचारले पाहिजे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना हे मंत्रीपद दिले जाऊ शकते आणि पंतप्रधानांनी तसे ठरवले असण्याची शक्यता वर्तवत, तसे झाले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपकडे संयम-विनम्रता नाही संजय राऊत म्हणाले की, संयम आणि विनम्रता हे शब्द भाजपच्या शब्दकोशातून गायब झाले आहेत. पण जेव्हा युवा शक्तीपुढे मोदींसारख्या नेत्यांना झुकावे लागते, तेव्हा हिटलरसारख्या सत्ताधीशांना झुकवल्याचा आनंद जनतेला होतो. या लढ्यात 21 मुलांचे बळी गेले असून अनेकांचे डोके फुटले आहे, असे सांगत आधी नियोजित असलेला मोर्चा रद्द करून आता कोणतीही पक्षीय निशाणी न वापरता ‘तिरंगा रॅली’ काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांसारखे विरोधकांनी एकत्र यावे संजय राऊत म्हणाले की, तरुणांच्या विचार आणि भाषेपुढे आयटी सेलला हार मानावी लागली. बहुमताचा माज दाखवून हिटलरसारखे वागाल, तर सत्तेतून तसेच बाहेर जावे लागेल, हा धडा राज्यकर्त्यांनी घ्यावा. जंतर-मंतरवर सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या, तसेच मतचोरी आणि आमदार-खासदार फोडाफोडीविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, तर मोदी सरकार एक दिवसही टिकणार नाही. उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवर जवळपास 35 मिनिटे चर्चा केली असून, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्याशीही संवाद साधला आहे. ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते मोडून काढण्यासाठी ही चर्चा झाल्या.
Source link
जंतर-मंतरच्या धक्क्याने हिटलरशाही झुकली:बहुमताचा माज दाखवू नका, अन्यथा सत्तेतून बाहेर व्हावे लागेल, संजय राऊतांचा भाजपला इशारा
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























