Homeमहाराष्ट्रजिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा:स्थानिकांचा विरोध झुगारून 24...

जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा:स्थानिकांचा विरोध झुगारून 24 हातगाड्या जप्त, 51 शेड्स भुईसपाट

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर शुक्रवारी (१७ जुलै) मोठी कारवाई केली. या मोहिमेत २४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून, ५१ अनधिकृत शेड्स निष्कासित करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वाढलेले अतिक्रमण आणि अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रोडवर अचानक धडक दिली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू होताच स्थानिक दुकानदारांनी व हातगाडीचालकांनी या मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, मनपाच्या अधिकाऱ्यांनी व पथकाने हा विरोध जुगारून कारवाई सुरूच ठेवली आणि रस्ता अतिक्रमणमुक्त केला. या धडक मोहिमेमुळे वाहतुकीला मोठा अडथळा ठरणारे ५१ शेड्स भुईसपाट करण्यात आले, तर २४ हातगाड्या जप्त करून कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, प्राप्ती जाधव, अशोक कदम यांच्यासह नागरी मित्र पथकाचे जवान आणि अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कारवाईमुळे रस्ता मोकळा झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राहुल गांधींची डेहराडूनमध्ये 8 हजार विद्यार्थ्यांशी चर्चा:म्हणाले- 1% लोक पेपरफुटीच्या मार्गावर चालतात, यामुळे 99%...

0
डेहराडूनमधील बन्नू स्कूल ग्राउंडवर आयोजित काँग्रेसच्या 'विद्यार्थ्यांची गर्जना' कार्यक्रमात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, भरती व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य हे सर्वात...

17 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत...

0
शुक्रवार, 17 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते आणि व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या नोकरदार...

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...
spot_img

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...
error: Content is protected !!