देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि कायदा त्यांना हटकत नाही. इतकेच नव्हे, तर ते हा चोरीचा माल घेऊन देशाच्या गृहमंत्र्यांकडे जातात आणि त्याला सोन्याचा मुलामा देण्याची मागणी करतात. गृहमंत्रीही त्याला मान्यता देत असतील, तर देशातील कायद्याच्या स्थितीबद्दल मला गंभीर चिंता वाटते, असे म्हणत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्हाला रामरक्षा वाचता येते की नाही, हा प्रश्न विचारण्यापेक्षा राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. रामरक्षा कशी म्हणायची ते आम्ही बघून घेऊ, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. मात्र, सध्याच्या सरकारला राम मंदिरातील चोरीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करणे जास्त महत्त्वाचे वाटत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष पुन्हा फुटणार अशा वावड्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक उठवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. भाजप आणि शिंदे गटाकडे सध्या दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच पक्षांतराच्या खोट्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही केवळ त्यांच्या मतदारसंघातील नगराध्यक्षांना बेकायदेशीरपणे अपात्र केल्याबद्दल त्यांनी त्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सुद्धा केली आहे. बिलाला पाठिंबा देणार ही अफवा डिलिमिटेशन बिलाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या अधिवेशनात हे बिल येणार की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही. मागच्या अधिवेशनात यावर चर्चा झाली तेव्हा सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत उपस्थित होते. आम्ही या बिलाला पाठिंबा देणार ही अफवा आहे. दिल्लीत सर्व विरोधक एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे लवकरच पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार राजकारणात व्यस्त संजय राऊत म्हणाले की, सध्या देशात ‘नीट’ पेपरफुटीचा अत्यंत गंभीर मुद्दा गाजतो आहे. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. देशासाठी हे खरे चिंतेचे विषय असायला हवेत, पण सरकार केवळ राजकीय डावपेचांमध्ये व्यस्त असल्याची टीका संजय राऊत यांनी शेवटी केली.
Source link
एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार ही अफवा- संजय राऊत
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























