भंडारा – स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे दाखल केला आहे. आता हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होतो की बारगळतो? याकडे नगरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 17 सदस्यीय लाखनी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2021 व जानेवारी 2022 अशा दोन टप्प्यात पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, भाजपा 6, काँग्रेस 2 व अपक्ष 1 असे एकूण 17 नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित असल्याने नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्रिवेणी पोहरकर यांची निवड झाली होती. त्यानंतर उपाध्यक्ष प्रदीप तितीरमारे यांनी राजीनाता दिल्यानंतर भाजपच्या लता रोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. विद्यमान नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून नगरपंचायतीच्या कारभारात लोकशाही पद्धतीने काम करण्याऐवजी एकतर्फी व मनमानी पद्धतीचा अवलंब केला. निर्णय प्रक्रियेतून डावलल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. त्यांनी अनेकदा नगरसेवकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. नगरपंचायतीत सामूहिक नेतृत्वाच्या तत्वाला हरताळ फासून सर्व अधिकार नगराध्यक्षांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. नगराध्यक्षांचे पती हे नगरपंचायतीच्या कारभारात प्रत्यक्षपणे हस्तक्षेप करतात. अध्यक्षांच्या एकतर्फी व मनमानी कारभारामुळे नगरपंचायतीमध्ये सुसंवाद, सहकार्य आणि लोकशाही मूल्यांना बाधा पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनावर विपरित परिणाम झाला आहे. या सर्व बाबींमुळे 13 नगरसेवकांनी त्यांना नगराध्यक्ष पदावरून दूर करण्यासाठी 1 जुलैला जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावेळी संदीप भांडारकर, राजेश निंबेकर, महेश आकरे, अश्विन धरमसारे, भूपेंद्र धरमसारे, सचिन भैसारे, प्रदीप तितीरमारे, विपुल कांबळे, विभा हजारे, कांता निर्वाण, निशा मोहनकर, सविता सोनवाणे, सारिका बशेशंकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष सभेचे आयोजन मंगळवारी लाखनी नगरपंचायतीच्या 13 नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर मत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जुलैला दुपारी 12 वाजता नगरपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे नगर सेवकांची पळवापळवी होते की, तटस्थतेची भूमिका घेतली जाते, याकडे लाखनी वासियांचे लक्ष लागले आहे.
Source link
लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड, 7 जुलैच्या विशेष सभेकडे लक्ष
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
इंटरकास्ट मॅरेज, शिमल्यात हनिमून, नंतर ऑस्ट्रेलियाला गेली पत्नी:आता परत येण्यास नकार, ₹34 लाखांच्या कर्जात...
आंतरजातीय विवाहानंतर पत्नीसोबत परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील संजीव कुमारचे आयुष्य 4 वर्षांत पूर्णपणे बदलले. लग्नाच्या अवघ्या एका...
रविवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेतून फायदा होईल, मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
5 जुलै, रविवारी सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा अडकलेला बोनस किंवा इंक्रीमेंट मंजूर होण्याची शक्यता...
FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...
काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही, सर्वजण एकत्र दिसतील:वडिंग म्हणाले- चन्नी, बाजवा, रंधावा आमचे वरिष्ठ; मुख्यमंत्रीपदाचा...
काँग्रेस हायकमांडने 2027 च्या विधानसभा निवडणुकांसाठी पंजाबमधील नेत्यांच्या भूमिका निश्चित केल्या आहेत. मात्र, यानंतर पक्षात गटबाजीच्या चर्चांनी जोर धरला. काही नेते प्रदेश काँग्रेस...
FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...
वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...
हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...
इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
































