राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे यांनी सांगितले की, केवळ मतदारसंघाचा विकास आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच एकत्र तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, श्री बालाजीच्या या दर्शनासाठी या दोन्ही नेत्यांनी तब्बल 11 किलोमीटरची पायपीट केल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या तिरुपती वारीमुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकतेच तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, यासाठी या नेत्यांनी तिरुपती ते तिरुमला डोंगरापर्यंत तब्बल 11 किलोमीटरचा पायी प्रवास केला. या भक्तीपूर्ण प्रवासाचे आणि देवदर्शनाचे ‘एक्सक्लुझिव्ह’ फोटो तसेच व्हिडिओ एका वृत्तवाहिनीच्या हाती लागले आहेत. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात या दोन्ही नेत्यांची नावे आघाडीवर असल्याने त्यांच्या या विशेष देवदर्शनाला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी रात्री सुरू झालेल्या या पायी प्रवासानंतर आज सकाळी सर्वांनी श्री बालाजीचे मनोभावे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार श्रीरंग बारणे, ॲड. निलेश देशमुख, चंद्रहार पाटील आणि ओमराजे यांचे बंधू हेदेखील उपस्थित होते. बालाजीच्या दर्शनानंतर या सर्व नेत्यांनी विजयवाडा येथे जाऊन कन्यका देवीचेही दर्शन घेत तिला साकडे घातले. या संपूर्ण देवदर्शनासाठी या सर्व खासदारांनी मुंबई, पुणे, तिरुपती आणि त्यानंतर विजयवाडा असा प्रदीर्घ प्रवास केला. पैलवान चंद्रहार पाटील यांनी काही खास फोटो शेअर करत या भक्तीपूर्ण प्रवासाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह त्यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. या सर्व नेत्यांनी रात्री 10 ते पहाटे 2.30 या वेळेत तब्बल 3800 पायऱ्या चढून जवळपास 11 किलोमीटरचे अंतर पायी पार केले आणि पहाटेच्या सुमारास श्री बालाजीचे मनोभावे दर्शन घेतले.
Source link
संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही घेतले दर्शन
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
शिमल्यात मुसळधार पाऊस, दिवसा अंधार पसरला:रस्ते पाण्याने तुडुंब भरले, चंबा येथे ऑरेंज अलर्ट; 2...
हिमाचल प्रदेशच्या राजधानीत दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते आणि मार्ग पाण्याने भरले. यावेळी शाळकरी मुलांना आणि...
हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...
कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...
अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...
अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...
व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...
लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...
50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...































