सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर मंगल कार्यालय, डाबकी रोडवरील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या दोन्ही शिबिरांमध्ये बाल साधकांचा प्रतिसाद लाभला. दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत झालेल्या या शिबिरांमध्ये लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणावयाचे श्लोक, आरोग्यासाठी विविध व्यायाम प्रकार, भारतातील थोर राष्ट्रीय पुरुष व संत यांचा दैदीप्यमान इतिहास, मंदिर आणि त्याचे महत्त्व, मंदिरात देवतांचे दर्शन घेण्याची योग्य पद्धत, मोठ्यांचा आदर कसा करावा, तसेच नमस्कार करण्याची शास्त्रोक्त पद्धत, यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आल्या. शिबिराच्या अंतिम दिवशी समारोप कार्यक्रम आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित पालकांशी संवाद साधण्यात आला. सहभागी बालकांनीही अनुभव सांगून अशा शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले. बालकांचा, पालकांचा सहभाग : या पाच दिवसीय शिबिराला विद्यार्थ्यांची लाभलेली उपस्थिती उल्लेखनीय होती. जानोरकर मंगल कार्यालयातील शिबिरात ८० हून अधिक तर राजेश्वर कॉन्व्हेंटमधील शिबिरात १५० हून अधिक बालकांनी सहभाग नोंदवला. सनातन संस्कृतीची ओळख, सणांची माहिती व संस्कार मुलांवर नियमित व्हावे म्हणून सनातन संस्थेच्या वतीने सर्वांसाठी खुले व विनामूल्य साप्ताहिक संस्कार वर्ग जुने शहर परिसरात सुरू आहेत. ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या पाल्यांना खालील वर्गात पाठवू शकता, असे कळवण्यात आले आहे. शिबिरामध्ये केवळ धार्मिकच नव्हे, तर मुलांच्या मनावर नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी बोधकथा सांगण्यात आल्या. तसेच कपाळावर टिळा लावण्याचे वैज्ञानिक व आध्यात्मिक महत्त्व, आध्यात्मिक दृष्टीने केक न कापता भारतीय पद्धतीने वाढदिवस कसा साजरा करावा, ऋषीमुनींनी लावलेले शोध आणि देवांशी आत्मनिवेदन कसे करावे (संवाद कसा साधावा) याविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि विविध आध्यात्मिक खेळही घेण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा आणि अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःचे गुणसंवर्धन कसे करावे, याचेही विशेष तंत्र या शिबिरात शिकवण्यात आले.
Source link
पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ
ब्रेकिंग न्यूज
वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे ‘एक पाउंड मांस’ वसूल करण्यासारखी24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या राशीच्या लोकांची प्रॉपर्टीची डील होईलमहिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारीपाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभगंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकतेबनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखलउदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नीऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावनाश्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये स्मृती मंधाना टॉप-5 मध्येया गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची योग्य पद्धत
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे ‘एक...
भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या...
24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...
महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...
गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...
महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...
श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...
या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...
नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...































