गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीची तब्बल एक तास चाललेली बैठक सकारात्मक ठरली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीकडून जाहीर करण्यात आला. या यशस्वी तोडग्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, आजपासूनच (21 जून) बेस्ट बसेसची वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा देत त्यांची थकीत ग्रॅच्युईटीची रक्कम याच वर्षी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यासोबतच, नवीन वेतन करार लागू होईपर्यंत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये आणि कंत्राटी कामगारांना 2 हजार रुपयांची हंगामी वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत बेस्टला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी शासनाकडून योग्य ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच, बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्यांची संख्या कमी असल्याने होणारा आर्थिक तोटा भरून काढण्याच्या उद्देशाने पुढील तीन वर्षांत तब्बल 5 हजार नवीन इलेक्ट्रिक वाहने ताफ्यात दाखल केली जाणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. दोन दिवस सुरू असलेल्या बेस्टच्या संपावर तोडगा काढताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, बेस्टची वाढती तूट आणि डेपोंची दुरावस्था लक्षात घेता तिचे सक्षमीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ‘बेस्ट’ची सेवा सर्वोत्तमच राहिली पाहिजे यावर भर देत, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युइटी याच आर्थिक वर्षात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, स्वतःच्या मालकीच्या गाड्यांमुळे तोटा कमी होणार असल्याने पुढील तीन वर्षांत 5 हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जातील आणि बेस्टला सक्षम करण्यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, या संपाबाबत भूमिका स्पष्ट करताना सचिन अहिर म्हणाले की, मुंबईकरांचे हाल करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता; ‘बेस्ट वाचली पाहिजे’ याच उद्देशाने आम्ही आमचे प्रश्न मांडले आणि सरकारनेही त्याची सकारात्मक दखल घेत प्रश्न मार्गी लावले आहेत.
Source link
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही निर्णय
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























