शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. समोर कितीही मोठी यंत्रणा, पैसा किंवा सत्ता असली तरी घाबरू नका. हा महाराष्ट्र आणि हा सामान्य शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही जी मेहनत घेताय, जो संघर्ष करताय तो वाया जाणार नाही. आता मागे हटायचं नाही, मैदानात उतरून या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन चंदनशिवे यांनी केले आहे. नितीन चंदनशिवे म्हणाले, शिवसैनिकांनी या 60 वर्षात खूप काही पाहिले आहे. दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्या आहेत. हृदयाला घाव घातले गेले, टाके उठले गेले, शिवत राहिले, शिवसेना फाटली नाही, तुटली नाही, ती जिद्दीने उभीच राहिली आणि उभी राहणारच असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मी एक एक नाही अनेक हुंदके घेऊन आलोय मी आलोय, मी एक एक नाही अनेक हुंदके घेऊन आलोय, मी आलोय महाराष्ट्रातल्या मराठी मातीचा हुंदका घेऊन, मी आलोय प्रत्येक मराठी मनाचा एक हुंदका घेऊन, मी धाराशीवच्या मातीचा हंबरडा घेऊन आलोय आणि गावगाड्यावरती पारावरती बसणाऱ्या म्हाताऱ्यांपासून ते नुकत्याच जन्माला आलेल्या पोरांच्या छातीच्या आत असलेल्या हृदयातल्या ठोक्याचा हुंदका घेऊन आलोय, अशी भावनिक सुरुवात नितीन चंदनशिवे यांनी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण सुरू पुढे बोलताना नितीन चंदनशिवे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव घेऊन राजकारण करत आहेत. किती उंचीचा पुतळा? यावर तुमचं प्रेम. पुतळ्यात महाराजांना बघायची सवय लागली, हीच घसरण आपल्या शहाणपणाची झाली आहे. ही पुन्हा भरून काढली पाहिजे. जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. माणसं जोडा, शिवसैनिक, भीम सैनिक, मनसैनिक, मराठी सैनिक ही सगळी एकत्रित या. या मातीला गरज आहे स्वाभिमानाची. बाळासाहेब ठाकरे आज देहाने नसले तरी मनगटात तो विचार आहे ना? तो स्वाभिमान जिवंत ठेवा, मला दिसतंय, लवकरच तुम्ही पुन्हा सत्तेत आहात. शिवसेनेचा जन्म इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला नितीन चंदनशिवे पुढे म्हणाले, शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधीच झाला नव्हता. शिवसेनेचा जन्म इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता. त्यामुळं कोण गेलं, कोण आलं यानं शिवसेना कधी संपली नाही आणि ती कधी संपणारी नाही. तुम्ही मराठी माणसासाठी लढलात, तुमच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्राने जवळ केलं आणि मग या माय मराठीने ही सत्ता तुमच्या पदरात दिली, याचा विसर पडल्यामुळे बरीच गणितं हल्लीत असं मला वाटतं. रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्यांना होता येतं, त्यांनाच निष्ठा कळत असते. आणि त्यांनाच चवदार तळ्याचं पाणी समजत असतं, आणि त्यांनाच भिडेवाड्यातल्या वर्गातल्या सावित्रीने फळ्यावर गिरवलेल्या पहिल्या अक्षरांचा अर्थ हे त्या निष्ठावंतांनाच कळत असतं, असे नितीन चंदनशिवे म्हणाले. माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा काळ आठवला मी. तर आमची आजी टीव्ही बघत असायची. टीव्हीत फक्त उद्धव साहेबांनाच बघायची. कारण काय माहिती आहे? माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला. माझ्या आईला संकट काळात सख्ख्या भावापेक्षा जवळचा भाऊ वाटला आणि आम्हा सगळ्यांना हा मुख्यमंत्री मामासारखा वाटला. लोकांनी सांगितलं की मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत. अरे, पण तो माणूस घरात बसून अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख म्हणून काळजी घेत होता, हे या कृतघ्न लोकांना कसं समजणार?
Source link
आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन चंदनशिवेंचे आवाहन
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























