Homeमहाराष्ट्रतहानलेल्या ठाण्याचं पाणी 'ॲमेझॉन'च्या घशात!:मेगा डेटा सेंटरवरून जितेंद्र आव्हाडांचा पालिकेवर हल्लाबोल, टीडीआरनंतर...

तहानलेल्या ठाण्याचं पाणी ‘ॲमेझॉन’च्या घशात!:मेगा डेटा सेंटरवरून जितेंद्र आव्हाडांचा पालिकेवर हल्लाबोल, टीडीआरनंतर आता नवा घोळ?

ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या गाजत असलेल्या टीडीआर घोटाळ्यावरून आधीच वनविभागासह पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच आता पालिकेच्या आणखी एका नव्या आणि वादग्रस्त निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की, अमेरिका आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ‘ॲमेझॉन’चा मेगा डेटा सेंटर प्रकल्प आता ठाण्यात उभारण्याचा घाट घातला जात आहे. या नव्या मेगा डेटा सेंटर प्रकल्पामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, या महाकाय प्रकल्पामुळे प्रत्यक्षात केवळ 60 जणांनाच रोजगार मिळणार असून, त्याबदल्यात सुमारे 600 ठाणेकरांच्या जीवावर आणि आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांची टीका ठाणे शहरात सध्या भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाणे महापालिका आयुक्तांनी स्वतः अर्थसंकल्पात शहराला 30 एम.एल.डी पाण्याची कमतरता असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. असे असताना, असे असताना तहानलेल्या ठाणेकरांच्या हक्काचे तब्बल 12 एम.एल.डी. पाणी या ॲमेझॉन डेटा सेंटरच्या घशात ओतले जाणार आहे, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. पाण्याच्या प्रचंड वापराव्यतिरिक्त या प्रकल्पामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी निदर्शनास आणून दिले. या महाकाय डेटा सेंटरसाठी अमर्याद विजेचा वापर केला जाईल, ज्यामुळे ऊर्जेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच, या प्रकल्पामधून दिवस-रात्र होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मोठा आणि नाहक त्रास आजूबाजूच्या स्थानिक ठाणेकरांना सहन करावा लागेल, अशी भीतीही आव्हाड व्यक्त केली आहे. आंदोलनाचा इशारा या सर्व कारणांमुळे या विनाशकारी डेटा सेंटरला आपला तीव्र विरोध राहील, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. या निर्णयाविरोधात केवळ पालिकेच्या सभागृहातच आवाज उठवणार नाही, तर जनतेच्या दरबारात जाऊन या प्रकरणाविरुद्ध उग्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा आव्हाड यांनी दिला आहे. याशिवाय, ज्यांना हा प्रकल्प हवा आहे, त्या संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची घरे याच ॲमेझॉनच्या डेटा सेंटरशेजारी बांधावीत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. जीवाशी खेळणारा हा विनाशकारी प्रकल्प शहराला हवाच कशाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही या प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पावरून पालिका प्रशासनावर कडाडून टीका केली आहे. हा महाकाय प्रकल्प ठाणेकरांच्या थेट मुळावर उठला असून, यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय नुकसान होणार असल्याची तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली. ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा विनाशकारी प्रकल्प शहराला हवाच कशाला? असा संतप्त सवाल करत, या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्यासोबतच न्यायालयात जाऊन कायदेशीर लढा देण्याचा ठाम निर्धार प्रधान यांनी व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्या या नव्या आरोपांमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आता कमालीचे तापले आहे. एकीकडे बहुचर्चित टीडीआर घोटाळ्यावरून आधीच पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना, आता त्यात या नव्या ‘डेटा सेंटर’च्या वादाची भर पडली आहे. त्यामुळे आगामी काळात हा ॲमेझॉन डेटा सेंटरचा मुद्दा ठाणे महानगरपालिकेसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी आणखी एक मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्या निर्माण झाले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!