मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार सागर ढवळे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याने रामटेके यांनी आपले उपोषण तूर्त मागे घेतले आहे. रामटेके यांनी १६ जूनपासून उपोषणाचा इशारा दिला होता. खोपडा शेत शिवारातील पाणंद रस्त्यामधून एका शेतकऱ्याने नाली काढून सिमेंट पाईप टाकले होते. यामुळे रामटेके यांच्या शेतात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती होती. याच मुद्द्यावर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. काही काळापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खोपडा ते लाडकी पाणंद रस्त्याचे काम सुरू होते. त्यावेळी रामटेके यांच्या शेजारील एका शेतकऱ्याने कोणतीही शासकीय परवानगी न घेता ठेकेदाराशी संगनमत करून शिवरस्त्यामधून ही नाली काढली होती. या नाल्यामुळे नरेंद्र रामटेके यांच्या शेतात पाणी शिरले होते. या समस्येबाबत रामटेके यांनी गतवर्षीच तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने शिरखेडचे मंडळ अधिकारी यांनी स्थळ निरीक्षण करून अहवाल सादर केला होता. या अहवालात शेजारील शेतकऱ्याने रस्त्याचे बेकायदेशीर खोदकाम करून व पाईप टाकून नरेंद्र रामटेके यांच्या शेतात पाणी सोडल्याचे स्पष्ट नमूद केले होते. अहवाल सादर होऊनही महसूल विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच रामटेके यांनी आपल्या मुलाबाळांसह उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. अखेर, तहसीलदार सागर ढवळे यांनी संबंधित कंत्राटदाराला आदेश दिले. पायलीपासून खाली तीन फुटाची खणती करून दोन्ही बाजूला दोनशे फुटांपर्यंत नाली काढून जमा होणारे पाणी नाल्याच्या मार्गाने सोडण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. या आदेशानंतर रामटेके यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
Source link
शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...
सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...
स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...
इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...
इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...
सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....
सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...
स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...






























