Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान राखणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देणे तसेच सुशासन निर्माण करण

.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य अभिवादन करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात शिवरायांच्या अलोट कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण करून स्वराज्याच्या आदर्शांना वंदन करण्यात आले. या प्रसंगी महापौर गाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महापौर गाडे म्हणाल्या, रायगड किल्ल्यावर पार पडलेला सोहळा हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर तो मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा विजय होता. या ऐतिहासिक घटनेमुळे मराठी अस्मितेला नवे बळ मिळाले. राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवा ही मूल्ये अंगीकारूनच आपण शिवरायांना खरी आदरांजली वाहू शकतो,” असे आवाहन महापौरांनी केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपालीताई बारस्कर यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी घेतलेल्या कडक भूमिकेचे स्मरण केले. शिवरायांचे लोककल्याणकारी निर्णय आजही राज्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. उपसभापती वर्षा सानप यांनी शिवरायांच्या राष्ट्रनिर्माणातील अथांग योगदानाचा गौरव केला. स्वराज्याच्या स्थापनेसाठी मावळ्यांनी केलेला संघर्ष आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची शिवरायांची शिकवण आजही आपल्यासाठी दिशादर्शक आहे.

या संपूर्ण सोहळ्यादरम्यान उपस्थितांनी दिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या गगनभेदी जयघोषाने पालिकेचा परिसर दुमदुमून गेला होता.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगाल सीमा पडताळणी | बांगलादेशात परतणारे स्थलांतरित

0
लेखक : अजय प्रकाश2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:अज्ञान, आळस, संकुचित विचार, कमकुवतपणा आणि नकारात्मक भावना...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; अज्ञान, आळस, संकुचित विचारसरणी, कमकुवतपणा आणि नकारात्मक भावना माणसाला आयुष्यात पुढे जाऊ...

वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...

0
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...

इंडिया ब्लॉक अलायन्स वाद; माकपने काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे

0
नवी दिल्ली5 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडिया ब्लॉकच्या बैठकीपूर्वी मित्रपक्षांनी काँग्रेसवर सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी, CPI(M) चे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी...
spot_img

वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...

0
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...

कर्णधार म्हणून गिलच्या दुसऱ्या सर्वात जलद हजार धावा:पंत 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा भारतीय...

0
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 85 षटकांत 3 गडी गमावून 368 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल...

कंट्री काउंटर्स; जगातील सर्व देश फिरण्याचा ट्रेंड:गर्दीला कंटाळलेले लोक अस्पर्शित ठिकाणांकडे वळत आहेत, तज्ज्ञ...

0
प्रशांत महासागरातील छोटासा बेट असलेला देश ‘तुवालु’... हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला हा देश जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे वर्षभरात एखादाच...

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...

0
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...
error: Content is protected !!