Homeमहाराष्ट्रLIC चा पैसा मोदींच्या मित्राचा नव्हे जनतेच्या घामाचा:काँग्रेसचा 'राजेश एक्स्पोर्ट'वरून घणाघात; मित्र...

LIC चा पैसा मोदींच्या मित्राचा नव्हे जनतेच्या घामाचा:काँग्रेसचा ‘राजेश एक्स्पोर्ट’वरून घणाघात; मित्र बचाव योजनेच्या चौकशीची मागणी

राजेश एक्स्पोर्ट नामक कंपनीच्या तब्बल 15 लाख रुपयांच्या कथित घोटाळ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राजेश एक्स्पोर्ट्स कंपनीवर सेबीने 15 लाख कोटींचा महसूल फुगवून दाखवल्याचा आरोप केला आहे. एलआयसीने जनतेचा पैसा या कंपनीत का गुंतवला? हा पैसा मोदींच्या मित्रांचा नव्हे, तर जनतेच्या घामाचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बंगळुरूच्या ‘राजेश एक्स्पोर्ट्स’ या नामांकित ज्वेलरी कंपनीने आकड्यांत हेराफेरी करून तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल फुगवून दाखवल्याचा धक्कादायक खुलासा बाजार नियामक ‘सेबी’ने केला आहे. या प्रकरणी सेबीने कंपनीचे चेअरमन राजेश मेहता यांच्यावर शेअर बाजारात कोणतीही खरेदी – विक्री किंवा व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. या कंपनीत एलआयसीनेही शेकडो कोटींची गुंतवणूक केल्यामुळे सर्वसामान्यांची गुंतवणूक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकार व एलआयसीवर उपरोक्त शब्दांत टीका केली आहे. ‘मित्र बचाव योजनेची’ चौकशी करा -सपकाळ हर्षवर्धन सपकाळ आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, राजेश एक्स्पोर्ट्स नावाच्या कंपनीवर तब्बल 15 लाख कोटी रुपयांचा महसूल फुगवून दाखवल्याचा गंभीर आरोप सेबीने केला आहे. इतकी मोठी रक्कम म्हणजे भारतात 15 बुलेट ट्रेन प्रकल्प उभे राहतील इतका पैसा! पण इथे गोष्ट राजेश मेहताची तर आहेच सोबतच आपण प्रीमियम भरत असलेल्या LICची पण आहे. जेव्हा अनेक मोठ्या गुंतवणूकदारांना या कंपनीत पैसा टाकणं धोकादायक वाटत होतं, तेव्हा LIC ने सामान्य जनतेचे शेकडो कोटी रुपये या कंपनीत का गुंतवले? LIC चा पैसा हा मोदींच्या मित्रांचा नाही, तर देशातील करोडो कुटुंबांच्या घामाच्या कमाईचा आहे. देशात एक नवीन नियमच बनला आहे. उद्योगपतींना नफा झाला तर तो त्यांचा… पण नुकसान झालं की जनतेचा पैसा पुढे केला जातो. बँका, LIC, सरकारी संस्था यांचा वापर करून मित्रांना वाचवायचं आणि त्याचं ओझं सामान्य लोकांच्या खांद्यावर टाकायचं. राजेश मेहतावर कारवाई झालीच पाहिजे, पण LIC ला या कंपनीत पैसा गुंतवायला कोणी भाग पाडलं? कोणाच्या आशीर्वादामुळे जनतेचे पैसे अशा संशयित कंपनीत गेले? या संपूर्ण ‘मित्र बचाव योजनेची’ चौकशी ही व्हायलाच पाहिजे, असे ते म्हणालेत. बंडखोर उमेदवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी दुसरीकडे, काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने या प्रकरणी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली असून या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!