नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू गुरु अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचाराचा पर्दाफाश करणारा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आपल्याला फोनवरून धमक्या येत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. “हा चित्रपट करू नका, अन्यथा तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करू,” अशा धमक्या काही महिला नेत्यांकडून दिल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष, सुशांत शेलार यांनी दीपाली सय्यद यांना पाठिंबा दिला आहे. अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरात व त्याच्या कारनाम्यांवर येणाऱ्या चित्रपटात सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. दीपाली सय्यद प्रस्तुत चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून, पुढील महिन्यापासून चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात भूमिका साकारण्यावरून आपल्याला धमक्या येत असल्याचा दावा दिपाली सय्यद यांनी केला आहे. नेमके काय म्हणाल्या दिपाली सय्यद? दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, खरात प्रकरणातील महिला नेत्याची (रूपाली चाकणकर) भूमिका साकारू नका, यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जात आहे. “तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त केले जाईल, असे धमकावणारे फोन काही महिला नेत्यांकडून आले आहेत,” असे त्यांनी उघड केले. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना दीपाली सय्यद म्हणाल्या, “मी एक कलाकार आहे आणि कोणाची परवानगी घेऊन काम करत नाही. मला स्क्रिप्ट मिळाली असून, चार महिने ‘बिग बॉस’मध्ये असल्यामुळे मला या प्रकरणाची सविस्तर माहिती नव्हती, पण आता सत्य समोर आले आहे. कर नाही त्याला डर कशाचा? मी या दबावाला घाबरत नाही आणि हे प्रकरण पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घालणार आहे”. शिवसेना चित्रपट सेना दीपाली सय्यद यांच्या पाठीशी दीपाली सय्यद यांच्यावर होणाऱ्या या दबावाचा शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी तीव्र निषेध केला आहे. सुशांत शेलार म्हणाले की, “दीपाली ताई उत्तम अभिनेत्री आहेत आणि त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणती भूमिका करायची हे त्यांनीच ठरवायचे आहे. अशा धमक्यांना त्यांनी भीक घालू नये, शिवसेना चित्रपट सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे”. विरोधकांनी ‘२० पैसे पर कमेंट’ देऊन ट्रोलर्स बसवले असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आता सगळं उघड होणार…! दरम्यान, या चित्रपटाची ‘आता सगळं उघड होणार…!’ ही टॅगलाईन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सदर चित्रपटात अशोक खरातच्या ढोंगीपणासह या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणातील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका व्यक्तीच्या कथित कृष्णकृत्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा असल्याचीही चर्चा आहे.
Source link
अशोक खरात प्रकरणावर येणार चित्रपट:रूपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या, शिवसेनेचा खंबीर पाठिंबा
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
‘गुलाबी आंखें…’ ते ‘जिंदगी कैसी है पहेली…’:नितीन गडकरी- देवेंद्र फडणवीसांच्या सुरेल गायनाने जिंकली नागपूरकरांची...
नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा आज अत्यंत दिमाखदार सोहळ्यात समारोप पार पडला. या विशेष कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री...
अयोध्या राम मंदिरातून 7 कोटींच्या चोरीचा दावा:अखिलेश म्हणाले- सरकारचे मौन संशयास्पद; माजी मंत्री म्हणाले-...
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आरोप आहे की, अयोध्या राम मंदिरात आलेल्या देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाली आहे. त्यांनी रविवारी दुपारी X पोस्ट...
Taurus Property Deal Gains, Virgo Income Source Resumes
7 दिवसांपूर्वीकॉपी लिंक1 जून, सोमवार रोजी मेष राशीच्या लोकांना सरकारी संस्थांकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मालमत्तेच्या व्यवहारात फायदेशीर करार मिळण्याची...
वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...
वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...
पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...
जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हवेची गळती:आपत्कालीन स्थितीत अंतराळवीरांना परत आणण्याची तयारी, नासाने चारही अंतराळवीरांना स्पेस...
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या रशियन भागात हवा गळती (एअर लीक) वाढल्यानंतर नासाने तेथे असलेल्या अंतराळवीरांना त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये लपून बसण्यास आणि संभाव्य सुरक्षित...
































