Homeमनोरंजनपीएम मोदींनी परिधान केलेले सर्वम एआय स्मार्ट चष्मा एआय शिखर मेटा ग्लासेसला...

पीएम मोदींनी परिधान केलेले सर्वम एआय स्मार्ट चष्मा एआय शिखर मेटा ग्लासेसला आव्हान देणारी वैशिष्ट्ये जाणून घ्या

पीएम मोदी एआय डेमो: भारतानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या या लाटेत सक्रिय सहभाग घेतला असून, जागतिक स्तरावर सध्या देश उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहे. याचीच प्रचिती आली, नुकत्याच पार पडलेल्या एआय समिटमध्ये. इथं आणि यासह अनेक स्तरांवर सध्या Sarvam AI ची बरीच चर्चा सुरू असून, काही दिवसांपूर्वी याच भारतीय बनावटीच्या AI मॉडेलनं OpenAI ChatGPT आणि Google Gemini ला मागे टाकलं होतं. आता हीच कंपनी पहिलं हार्डवेअर डिवाईस जगापुढं आणत असून त्याची पहिली झलकही समोर आली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सोशल मीडियावर समोर आलाय पंतप्रधानांसह एक खास फोटो…

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकता एक फोटो समोर आला असून, कंपनीचे प्रमुख प्रत्युष कुमार यांनीच हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी कंपनीकडून आगामी काळात लाँच केल्या जाणाऱ्या या प्रोडक्टची झलकही सर्वांसमोर आणली. AI Impact Summit सुरू असतानाच एक अफलातून प्रोडक्ट जगासमोर आणणाऱ्या या कंपनीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.

एका व्हिडीओच्या माध्यातून प्रत्यूष यांनी या स्मार्ट ग्लासेस अर्थात स्मार्ट चष्म्याची झलक दाखवली आहे. Sarvam Kaze असं या प्रोडक्टचं नाव असून ते काहीसं मेटाच्या  Meta RayBan सारखीच त्याची रचना आहे. हा स्मार्ट चष्मा वापरणारी पहिलीच व्यक्ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

कंपनीच्या प्रमुखांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा स्मार्ट चष्मा पूर्णपणे भारतीय बनावटीचा असून AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेला मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनपुरता सीमित न ठेवचा दैनंदिन जीवनाताही एक भाग करणं हा यामागचा मुख्य हेतू असल्याचं कुमार यांनी स्पष्ट केलं.

हा चष्मा नेमकं काय करतो?

प्रत्युष कुमार यांच्या माहितीनुसार ‘हा चष्मा तुम्ही लावता तेव्हा, तो तुमचं ऐकतो, तुम्हाला समजून घेतो आणि तुम्हाला उत्तरंही देतो. तुम्ही जे पाहता ते रेकॉर्ड करतो. बरं यातून तुम्ही तुम्हाला हवा तो अनुभवही तयार करू शकता.’

राहिला मुद्दा ही कमाल गोष्ट लाँच कधी होणार, तर 2026 मध्येच मे महिन्यात हा चष्मा लाँच केला जाणार असून, ते इनहाऊस AI मॉडेलवर काम करेल. दरम्यान, इतकी चर्चा असली तरीही अद्याप या स्मार्ट चष्म्याची किंमत मात्र समोर आली नाहीय.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
spot_img

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच...

0
माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त 'सर्व काही ठीक होईल' असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश...
error: Content is protected !!