HomeमनोरंजनIND vs NAM T20 World Cup 2026 Why Team India Cancelled Practice...

IND vs NAM T20 World Cup 2026 Why Team India Cancelled Practice Session Before Match Against Namibia | T20 World Cup 2026: भारताच्या India vs Namibia दुसऱ्या सामन्याआधी सराव सत्र रद्द, कारण…


भारताने दुसऱ्या T20 विश्वचषक 2026 सामन्यापूर्वी सराव सत्र का रद्द केले: टी20 वर्ल्ड कप 2026 मधील ग्रुप ‘A’ मध्ये भारत आणि नामीबिया यांच्यातील सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा या स्पर्धेतील भारतीय संघाचा दुसरा सामना असेल. मात्र या लढतीपूर्वी टीम इंडियाने दिल्लीत आपलं पहिलं नियोजित सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नामीबियाविरुद्धच्या सामन्याआधी, सोमवारी अरुण जेटली स्टेडियमवर ठेवण्यात आलेलं ऑप्शनल ट्रेनिंग सेशन भारतीय संघाने टाळलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या निर्णयामागचं ठोस कारण अद्याप अधिकृतरीत्या सांगण्यात आलेलं नाही. मात्र मैदानाच्या उपलब्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण 10 फेब्रुवारी रोजी नामीबिया आणि नेदरलँड्स हे दोन्ही संघ याच मैदानावर सराव करणार आहेत. नामीबिया संघ सकाळच्या सत्रात, तर नेदरलँड्स संघ संध्याकाळच्या सत्रात सराव करेल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काय आहे अधिकृत निवेदनात?

दरम्यान, बीसीसीआयने नंतर अधिकृत निवेदन जाहीर करत स्पष्ट केलं की हा भारतीय संघासाठी विश्रांतीचा दिवस होता. त्यामुळे कोणताही सराव किंवा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली नव्हती. मंगळवारी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत टीम इंडिया अरुण जेटली स्टेडियमवर सराव करणार आहे.

हे ही वाचा: पाकिस्तानची कुरघोडी? भारताविरुद्ध T20 World Cup सामना खेळण्यासाठी ICC समोर ठेवल्या तीन मोठ्या अटी

गंभीरच्या घरी जेवणाचा कार्यक्रम

याआधी रविवारी रात्री संपूर्ण भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी एकत्र जेवणासाठी जमला होता.

हे ही वाचा: Under 19 World Cup जिंकूनही टीम इंडियाला ICC कडून प्राइज मनी नाही, कारण काय? जाणून घ्या

विजयासह भारतीय संघाची दमदार सुरुवात

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मुंबईत अमेरिकेविरुद्ध शानदार विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला. मात्र सामन्याच्या पहिल्या टप्प्यात अमेरिकेने भारतीय संघाला चांगलंच अडचणीत टाकलं होतं. एका टप्प्यावर भारताची अवस्था 77 धावांत 6 विकेट अशी झाली होती.

अशा परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने जबाबदारी घेत 49 चेंडूंमध्ये नाबाद 84 धावांची झुंजार खेळी केली आणि भारताचा स्कोअर 20 षटकांत 9 बाद 161 धावांपर्यंत नेला.

हे ही वाचा: विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये वाद? BCCI सेक्रेटरीने देवजीत सैकियांनी अखेर सोडले मौन

लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघ 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या क्षणी संघात सामील झालेल्या मोहम्मद सिराजने 29 धावांत 3 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्तीला एक यश मिळालं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ढोल-ताशा परंपरेच्या संवर्धनासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक:परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांचे मत

0
ढोल-ताशा वादनाची परंपरा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तरच अधिकाधिक युवकांना या...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक:कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी...

0
व्हिएतनाममध्ये शनिवारी पर्यटकांची स्पीडबोट उलटल्याने 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर स्पीडबोट कॅप्टनला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार,...
spot_img

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

भारतातील महागाईचा दर जूनमध्ये ४.३८ टक्क्यांवर; अन्नाच्या किमती वाढतात

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशातील किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. जूनमध्ये ती वाढून 4.38% वर पोहोचली आहे, जी मे महिन्यात 3.93% होती....

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
error: Content is protected !!