Homeमनोरंजनऑटो न्यूज यामाहा इलेक्ट्रिक स्कूटर EC 06 मध्ये मायलेजची किंमत आहे

ऑटो न्यूज यामाहा इलेक्ट्रिक स्कूटर EC 06 मध्ये मायलेजची किंमत आहे


ऑटो बातम्या: नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारनं इलेक्ट्रीकस वाहनांसाठी वापरल्य़ा जाणाऱ्या अनेक गोष्टी, धातूंच्या दरावरील कर कपातीचा निर्णय जाहीर केला. परिणामी बॅटरीचे दर कमी झाल्यास देशात ईलेक्ट्रीक वाहनांच्या किमतीसुद्धा कमी होतील ही बाब अधोरेखित झाली आणि याच चर्चांमध्ये ‘यामाहा इंडिया’नं भारतात कंपनीची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

Yamaha electric scooter EC 06 असं या स्कूटरचं नाव असून, या स्कूटरसह कंपनीनं दुचाकी वाहनांच्या विश्वातील EV च्या नव्या पर्वात महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. Yamaha EC-06 कारची एक्स शोरूम किंमत 1,67,600 रुपये इतकी असून, सुरुवातीला ही स्कूटर भारतातील निवडक Blue Square प्रीमियम डीलरशिपच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. लाँच करतेवेळी कंपनीनं या बाईकचा  Bluish White हा पर्याय सादर केला.

मायलेजच्या बाबतीत का चर्चेत आहे ही स्कूटर?

Yamaha EC-06 स्कूटरला कंपनीनं 4kWh ची फिक्स्ड बॅटरी दिली असून त्यासोबत nterior Permanent Magnet Synchronous Motor म्हणजेच IPMSM सुद्धा मिळत आहे. कंपनीच्या दाव्यानुसार स्कूटरची ही मोटर 6.7kW इतकी पॉवर जनरेट करून 26 Nm इतका टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचा टॉप स्पीड 79 किमी प्रतितास इतका आहे. तर, कंपनीच्या सांगण्यानुसार ही स्कूटर एकदा चार्ज केल्यास 169 किमी अर्थात साधारण मुंबई-नाशिक इतक्या अंतराचा प्रवास करते. त्यामुळं दैनंदिन वापरासाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही.

Yamaha EC-06 स्कूटर Eco, Standard आणि Power अशा तीन रायडिंग मोडमध्ये उपलब्घ असून, शहरातील चिंचोळ्या रस्त्यांवरही ही स्कूटर अगदी सहजपणे चालते, ज्यामध्ये कंपनीनं रिवर्स मोडसुद्धा देण्यात आला आहे. सस्पेंशनसाठी या स्कूटरमध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्स आणि मागे रिअर कॉईल स्प्रिंग देण्यात आलं आहे. तर, ब्रेकिंगसाठी पुढे आणि मागे 200 mm डिस्क ब्रेकसोबत सीबीएस सिस्टीम देण्यात आली आहे.

स्कूटरला स्मार्ट फिचरमुळं खास टच…

LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर असणाऱ्या या स्कूटरमध्ये वेग, बॅटरी स्टेटस आणि रायडिंग मोड अशी माहिती मिळते. एलईडी लायटिंग असणारी ही स्कूटर Yamaha Motor Connect R App सह स्मार्टफोन कनेक्चीव्हिटी देते आणि महत्त्वाचं म्हणजे ही स्कूटर, (बॅटरी) घराच्या चार्जिंग सॉकेटनंही चार्ज होते. चार्जिंग फुल्ल करण्यासाठी इथं 8 तासांचा वेळ द्यावा लागतो. कंपनीकडून या स्कूटर बॅटरीवर 3 वर्षांत 30000 किमी इतकी वॉरंची गेण्यात आल्यानं आता खरेदीदार यामाहाच्या या मॉडेलला कशी पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!