ऑटो बातम्या: नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारनं इलेक्ट्रीकस वाहनांसाठी वापरल्य़ा जाणाऱ्या अनेक गोष्टी, धातूंच्या दरावरील कर कपातीचा निर्णय जाहीर केला. परिणामी बॅटरीचे दर कमी झाल्यास देशात ईलेक्ट्रीक वाहनांच्या किमतीसुद्धा कमी होतील ही बाब अधोरेखित झाली आणि याच चर्चांमध्ये ‘यामाहा इंडिया’नं भारतात कंपनीची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे.
Yamaha electric scooter EC 06 असं या स्कूटरचं नाव असून, या स्कूटरसह कंपनीनं दुचाकी वाहनांच्या विश्वातील EV च्या नव्या पर्वात महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. Yamaha EC-06 कारची एक्स शोरूम किंमत 1,67,600 रुपये इतकी असून, सुरुवातीला ही स्कूटर भारतातील निवडक Blue Square प्रीमियम डीलरशिपच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. लाँच करतेवेळी कंपनीनं या बाईकचा Bluish White हा पर्याय सादर केला.
मायलेजच्या बाबतीत का चर्चेत आहे ही स्कूटर?
Yamaha EC-06 स्कूटरला कंपनीनं 4kWh ची फिक्स्ड बॅटरी दिली असून त्यासोबत nterior Permanent Magnet Synchronous Motor म्हणजेच IPMSM सुद्धा मिळत आहे. कंपनीच्या दाव्यानुसार स्कूटरची ही मोटर 6.7kW इतकी पॉवर जनरेट करून 26 Nm इतका टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचा टॉप स्पीड 79 किमी प्रतितास इतका आहे. तर, कंपनीच्या सांगण्यानुसार ही स्कूटर एकदा चार्ज केल्यास 169 किमी अर्थात साधारण मुंबई-नाशिक इतक्या अंतराचा प्रवास करते. त्यामुळं दैनंदिन वापरासाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही.
Yamaha EC-06 स्कूटर Eco, Standard आणि Power अशा तीन रायडिंग मोडमध्ये उपलब्घ असून, शहरातील चिंचोळ्या रस्त्यांवरही ही स्कूटर अगदी सहजपणे चालते, ज्यामध्ये कंपनीनं रिवर्स मोडसुद्धा देण्यात आला आहे. सस्पेंशनसाठी या स्कूटरमध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्स आणि मागे रिअर कॉईल स्प्रिंग देण्यात आलं आहे. तर, ब्रेकिंगसाठी पुढे आणि मागे 200 mm डिस्क ब्रेकसोबत सीबीएस सिस्टीम देण्यात आली आहे.
यामाहाला इलेक्ट्रिक सारखे भेटते #कधीच नाही
सादर करत आहोत सर्व-नवीन Yamaha EC-06- इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नवीन युगात कामगिरी आणि अचूकता.
अधिक जाणून घ्या- #YamahaEC06 #EC06 #YamahaEV #विद्युतक्रांती #CallOfTheBlue #YamahaMotorIndia pic.twitter.com/iKmxkEBPB8— यामाहा मोटर इंडिया (@India_Yamaha) 2 फेब्रुवारी 2026
स्कूटरला स्मार्ट फिचरमुळं खास टच…
LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर असणाऱ्या या स्कूटरमध्ये वेग, बॅटरी स्टेटस आणि रायडिंग मोड अशी माहिती मिळते. एलईडी लायटिंग असणारी ही स्कूटर Yamaha Motor Connect R App सह स्मार्टफोन कनेक्चीव्हिटी देते आणि महत्त्वाचं म्हणजे ही स्कूटर, (बॅटरी) घराच्या चार्जिंग सॉकेटनंही चार्ज होते. चार्जिंग फुल्ल करण्यासाठी इथं 8 तासांचा वेळ द्यावा लागतो. कंपनीकडून या स्कूटर बॅटरीवर 3 वर्षांत 30000 किमी इतकी वॉरंची गेण्यात आल्यानं आता खरेदीदार यामाहाच्या या मॉडेलला कशी पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.






























