HomeमनोरंजनPt Usha Shared Ajit Pawar Rare Photo made Post By After His...

Pt Usha Shared Ajit Pawar Rare Photo made Post By After His Plane Crash Death | Ajit Pawar: पीटी उषा यांनी शेअर केला अजित पवारांचा असा फोटो जो जास्त कोणी पहिला नसेल, वाहिली श्रद्धांजली


पं उषा यांनी अजित पवार यांचे दुर्मिळ छायाचित्र शेअर केले: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या या अपघाती निधनानंतर देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. आज 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अनेक माध्यमातून अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  अशाच श्रद्धांजलींपैकी एक वेगळी आणि लक्षवेधी श्रद्धांजली भारताच्या महान धावपटू पी. टी. उषा यांनी वाहिली आहे. त्यांनी शेअर केलेला एक दुर्मीळ फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून, हा फोटो याआधी फारच थोड्या लोकांनी पाहिला असेल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

क्रीडा क्षेत्रातही मोठे योगदान

विमान अपघातात अजित पवार यांचे अचानक निधन झाल्याची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक ठरली. अनुभवी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन क्रीडा क्षेत्रासाठीही मोठे योगदान दिले होते. देशपातळीवर भारताचे नाव उज्वल करणाऱ्या अनेक खेळाडूंना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता.

हे ही वाचा: Ajit Pawar: खेळाडूंना आर्थिक मदत ते बक्षीस रक्कमेत वाढ…, महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला आकार देण्यात अजित पवारांची महत्त्वाची भूमिका

पी. टी. उषा यांनी पहिले होते जवळून काम

पी. टी. उषा या महाराष्ट्राच्या नसल्या, तरीही अजित पवार यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य त्यांना जवळून माहिती होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम आणि खेळाडूंसाठी उभारलेल्या सुविधा याचा उषा यांच्यावर खोल प्रभाव होता. म्हणूनच श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी अजित पवार यांचा खेळावरील प्रेम दाखवणारा एक खास फोटो शेअर केला.

हे ही वाचा: “दादाला ‘I Love You’ सांग…” कार्यकर्त्याची पार्थ पवारांना भावनिक विनंती, VIDEO बघून काळजाचं पाणी होईल

काय पोस्ट केली?

श्रद्धांजली देताना पी. टी. उषा म्हणाल्या की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनाने खूप दुःख झाले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रांप्रती आणि समर्थकांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.” यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला  आहे. या फोटोमध्ये अजित पवार रायफल शूटिंग करत असताना दिसत आहेत.

अजित पवार यांच्या कार्यकाळात केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील क्रीडा पायाभूत सुविधांनाही नवी दिशा मिळाली. आधुनिक सुविधा, संधी आणि पाठबळ यामुळे अनेक खेळाडूंना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रासोबतच क्रीडा विश्वालाही मोठी हानी झाली आहे.

हे ही वाचा: Ajit Pawar Famous Dialogues: अजितदादांचा स्वॅग, थेट, स्पष्ट आणि करारी..पाहा अजित पवारांचे Top 5 व्हायरल डायलॉग्स, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला

राजकारण, समाजकारण आणि क्रीडा क्षेत्र या तिन्ही पातळ्यांवर अजित पवार यांनी केलेले काम कायम लक्षात राहील, असेच अनेक मान्यवरांचे मत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!