पं उषा यांनी अजित पवार यांचे दुर्मिळ छायाचित्र शेअर केले: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या या अपघाती निधनानंतर देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. आज 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अनेक माध्यमातून अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अशाच श्रद्धांजलींपैकी एक वेगळी आणि लक्षवेधी श्रद्धांजली भारताच्या महान धावपटू पी. टी. उषा यांनी वाहिली आहे. त्यांनी शेअर केलेला एक दुर्मीळ फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून, हा फोटो याआधी फारच थोड्या लोकांनी पाहिला असेल.
क्रीडा क्षेत्रातही मोठे योगदान
विमान अपघातात अजित पवार यांचे अचानक निधन झाल्याची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक ठरली. अनुभवी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन क्रीडा क्षेत्रासाठीही मोठे योगदान दिले होते. देशपातळीवर भारताचे नाव उज्वल करणाऱ्या अनेक खेळाडूंना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता.
हे ही वाचा: Ajit Pawar: खेळाडूंना आर्थिक मदत ते बक्षीस रक्कमेत वाढ…, महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला आकार देण्यात अजित पवारांची महत्त्वाची भूमिका
पी. टी. उषा यांनी पहिले होते जवळून काम
पी. टी. उषा या महाराष्ट्राच्या नसल्या, तरीही अजित पवार यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य त्यांना जवळून माहिती होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम आणि खेळाडूंसाठी उभारलेल्या सुविधा याचा उषा यांच्यावर खोल प्रभाव होता. म्हणूनच श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी अजित पवार यांचा खेळावरील प्रेम दाखवणारा एक खास फोटो शेअर केला.
हे ही वाचा: “दादाला ‘I Love You’ सांग…” कार्यकर्त्याची पार्थ पवारांना भावनिक विनंती, VIDEO बघून काळजाचं पाणी होईल
काय पोस्ट केली?
श्रद्धांजली देताना पी. टी. उषा म्हणाल्या की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनाने खूप दुःख झाले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रांप्रती आणि समर्थकांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.” यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजित पवार रायफल शूटिंग करत असताना दिसत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. यांच्या आकस्मिक निधनाने धक्का व दु:ख झाले. अजित पवार जी. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवल्यामुळे त्यांची उणीव क्रीडाक्षेत्रात जाणवणार आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांसोबत माझे मनःपूर्वक संवेदना.
शांती बद्दल pic.twitter.com/iBpQd0PA5z— पीटी उषा (@PTUshaOfficial) 28 जानेवारी 2026
अजित पवार यांच्या कार्यकाळात केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील क्रीडा पायाभूत सुविधांनाही नवी दिशा मिळाली. आधुनिक सुविधा, संधी आणि पाठबळ यामुळे अनेक खेळाडूंना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रासोबतच क्रीडा विश्वालाही मोठी हानी झाली आहे.
हे ही वाचा: Ajit Pawar Famous Dialogues: अजितदादांचा स्वॅग, थेट, स्पष्ट आणि करारी..पाहा अजित पवारांचे Top 5 व्हायरल डायलॉग्स, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला
राजकारण, समाजकारण आणि क्रीडा क्षेत्र या तिन्ही पातळ्यांवर अजित पवार यांनी केलेले काम कायम लक्षात राहील, असेच अनेक मान्यवरांचे मत आहे.





























