इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलिस ठाणे हद्दीतील करंजवाडी (अडसरे बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतीलच एका शिक्षकाने माणुसकीला काळिमा फासला. तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षांच्या विद्यार्थिनीवर त्याने तब्बल सात ते आठ महिने लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे त
.
त्यानुसार शिक्षक रामचंद्र मनाजी कचरे (५५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला कोर्टात हजर केले असता २४ जानेवारीपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. करंजवाडीच्या जि.प. शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीने १६ जानेवारी रोजी रात्री आपल्या आजीला शिक्षकाकडून आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. आजीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. यापूर्वी परिसरातीलच टाकेद येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण गाजले होते.
फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलन, वैद्यकीय तपासणी : फिर्यादीच्या माहितीनुसार, शिक्षक रामचंद्र कचरे याने यापूर्वीही अनेक वेळा अशी कृत्ये केल्याचा संशय आहे. या प्रकरणात घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम बोलावून शास्त्रीय पद्धतीने तपास करण्यात आला आहे. पुरावे संकलन, वैद्यकीय तपासणी व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांनी विशेष पथक नियुक्त केले. त्यात निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक एस. बी. देवरे, गुरुदेव मोरे व हवालदार तुषार ढगे यांचा समावेश आहे.
सिन्नरमधील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत दुसरीतील विद्यार्थिनीचा विनयभंग
सिन्नर | सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीमध्ये शिकणाऱ्या ८ वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शिक्षक सायकत प्रामाणिक याच्याविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























