Homeमनोरंजनऑटो न्यूज इलेक्ट्रिक कार टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही मारुती ई विटारा टाटा...

ऑटो न्यूज इलेक्ट्रिक कार टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही मारुती ई विटारा टाटा सिएरा इलेक्ट्रिक आवृत्ती नवीनतम अपडेट लाँच केली जाईल


EV कार भारत :  भारतीय ऑटो क्षेत्रानं गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय झपाट्यानं प्रगती केली असून, जागतिक स्तरावरील वैशिष्ट्य असणारे फिचर्स सध्या भारतातील अनेक कारमध्ये देण्यात येत आहे. अशाच, ‘इलेक्ट्रीक वेहिकल’ श्रेणीत येणाऱ्या तीन बहुप्रतिक्षित कार भारतात 2026 मध्ये लाँच होणार असून, पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत या EV कारना सध्या बरीच पसंतीसुद्धा मिळताना दिसत आहे. ज्यामुळं आगामी काळात लाँच होणाऱ्या या कारसुद्धा भारतात लोकप्रियता मिळवतील असं या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारतीय ऑटो क्षेत्राचा आणि ग्राहकांचा एकंदर कल पाहता मोठ्या कार कंपन्या देशात नव्यानं काही ईलेक्ट्रीक मॉडेल उतरवण्यासाठी सज्ज झाले असून, या कंपन्यांची तयारी पाहता देशात मिड-साइज इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये असणारी स्पर्धा आणखी वाढणार असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. या स्पर्धेत सध्या बाजी मारण्याच्या तयारीत असणाऱ्या कंपन्या आहेत टोयोटा, मारुती सुझूकी आणि टाटा मोटर्स, ज्यांच्या कार थेट ह्युंडई क्रेटा ईव्हीला टक्कर देतील.

टाटा सिएरा (टाटा सिएरा ईव्ही)

टाटाची सध्याची बहुचर्चित अशी सिएरा ईव्ही वर्जनमध्ये नव्या पद्धतीनं तयार करण्यात आली असून, कंपनी या कारमध्ये 65kWh, 75kWh इतकी बॅटरी देऊ शकते. या कारची संभाव्य रेंज 500 किमी इतकी असेल. या SUV मध्ये V2V आणि V2L सह मॉडर्न टेक्नोलॉजी, 5G कनेक्टिविटी आणि आधुनिक तंत्रज्ञानावर काम करणारे सेफ्टी फिचर असतील. ज्यामुळं ही कार सुरक्षित प्रवासाचा दावा करेल. या कारची लाँच होण्याची तारीख समोर आली नसून, पुढील काही महिन्यांत ती भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल असं सांण्यात येत आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर EV

टोयोटाच्या अर्बन क्रूजरला भारतात प्रथमच विक्रीसाठी लाँच केलं जाणार असून, लवकरच कंपनीकडून कारच्या किमतीचा खुलासा करण्यात येईल. ही एसयुव्ही बहुतांशी मारुचिच्या e Vitaraशी मिळतीजुळती असून, त्यामध्ये 49kWh आणि 61kWh अशा दोन बॅटरीमध्ये पर्याय दिले जातील. एकदा चार्ज केल्यास ही कार 500 किमीहून अधिक रेंज देण्याचा दावा कंपनी करू शकते. ज्यामध्ये प्रिमियम लूक ही कारची जमेची बाजू असेल.

मारुती सुझुकी ई-विटारा इलेक्ट्रिक एसयूव्ही (मारुती ई विटारा)

मारुतिची ई विटारा इलेक्ट्रीक कार जानेवारी अखेरीस लाँच होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही कार प्राथमिक स्वरुपात तीन व्हेरिएंटमध्ये सादर केली जाईल. ज्यामध्ये अर्बन क्रूजरप्रमाणंच 49kWh, 61kWh असे दोन बॅटरी पर्याय असतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा भरणा असणारी ही कार 7 एअरबॅग सेफ्टी फिचर देईल.

एकंदरच देशातील ईव्हींमध्ये लाँच होणाऱ्या या कार पाहता लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच आरामदायी प्रवास करण्याची मुभा या कार देतील असं त्यांचे फिचर पाहून लक्षात येत आहे. त्यामुळं कार खरेदीच्या विचारात असाल तर या मॉडेलची वाट पाहणं एक चांगला पर्याय असेल…





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!