EV कार भारत : भारतीय ऑटो क्षेत्रानं गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय झपाट्यानं प्रगती केली असून, जागतिक स्तरावरील वैशिष्ट्य असणारे फिचर्स सध्या भारतातील अनेक कारमध्ये देण्यात येत आहे. अशाच, ‘इलेक्ट्रीक वेहिकल’ श्रेणीत येणाऱ्या तीन बहुप्रतिक्षित कार भारतात 2026 मध्ये लाँच होणार असून, पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत या EV कारना सध्या बरीच पसंतीसुद्धा मिळताना दिसत आहे. ज्यामुळं आगामी काळात लाँच होणाऱ्या या कारसुद्धा भारतात लोकप्रियता मिळवतील असं या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.
भारतीय ऑटो क्षेत्राचा आणि ग्राहकांचा एकंदर कल पाहता मोठ्या कार कंपन्या देशात नव्यानं काही ईलेक्ट्रीक मॉडेल उतरवण्यासाठी सज्ज झाले असून, या कंपन्यांची तयारी पाहता देशात मिड-साइज इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये असणारी स्पर्धा आणखी वाढणार असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. या स्पर्धेत सध्या बाजी मारण्याच्या तयारीत असणाऱ्या कंपन्या आहेत टोयोटा, मारुती सुझूकी आणि टाटा मोटर्स, ज्यांच्या कार थेट ह्युंडई क्रेटा ईव्हीला टक्कर देतील.
टाटा सिएरा (टाटा सिएरा ईव्ही)
टाटाची सध्याची बहुचर्चित अशी सिएरा ईव्ही वर्जनमध्ये नव्या पद्धतीनं तयार करण्यात आली असून, कंपनी या कारमध्ये 65kWh, 75kWh इतकी बॅटरी देऊ शकते. या कारची संभाव्य रेंज 500 किमी इतकी असेल. या SUV मध्ये V2V आणि V2L सह मॉडर्न टेक्नोलॉजी, 5G कनेक्टिविटी आणि आधुनिक तंत्रज्ञानावर काम करणारे सेफ्टी फिचर असतील. ज्यामुळं ही कार सुरक्षित प्रवासाचा दावा करेल. या कारची लाँच होण्याची तारीख समोर आली नसून, पुढील काही महिन्यांत ती भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल असं सांण्यात येत आहे.
टोयोटा अर्बन क्रूझर EV
टोयोटाच्या अर्बन क्रूजरला भारतात प्रथमच विक्रीसाठी लाँच केलं जाणार असून, लवकरच कंपनीकडून कारच्या किमतीचा खुलासा करण्यात येईल. ही एसयुव्ही बहुतांशी मारुचिच्या e Vitaraशी मिळतीजुळती असून, त्यामध्ये 49kWh आणि 61kWh अशा दोन बॅटरीमध्ये पर्याय दिले जातील. एकदा चार्ज केल्यास ही कार 500 किमीहून अधिक रेंज देण्याचा दावा कंपनी करू शकते. ज्यामध्ये प्रिमियम लूक ही कारची जमेची बाजू असेल.
मारुती सुझुकी ई-विटारा इलेक्ट्रिक एसयूव्ही (मारुती ई विटारा)
मारुतिची ई विटारा इलेक्ट्रीक कार जानेवारी अखेरीस लाँच होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही कार प्राथमिक स्वरुपात तीन व्हेरिएंटमध्ये सादर केली जाईल. ज्यामध्ये अर्बन क्रूजरप्रमाणंच 49kWh, 61kWh असे दोन बॅटरी पर्याय असतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा भरणा असणारी ही कार 7 एअरबॅग सेफ्टी फिचर देईल.
मारुती आणि टोयोटा ईव्ही एसयूव्ही जवळजवळ येथे आहेत
मारुती ई-विटारा: १३ जानेवारी
टोयोटा अर्बन क्रूझर EV: 16 जानेवारी
दावा केलेली श्रेणी 543 किमी (ARAI) पर्यंत
संभाव्य मास-मार्केट EV क्रांती pic.twitter.com/0ha5R7OC1y— सोशल कट्टा (@NNitin363409) 13 जानेवारी 2026
एकंदरच देशातील ईव्हींमध्ये लाँच होणाऱ्या या कार पाहता लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच आरामदायी प्रवास करण्याची मुभा या कार देतील असं त्यांचे फिचर पाहून लक्षात येत आहे. त्यामुळं कार खरेदीच्या विचारात असाल तर या मॉडेलची वाट पाहणं एक चांगला पर्याय असेल…































