Homeमनोरंजनमुस्ताफिजुर रहमान आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर आयपीएल 2026 च्या प्रसारणावर बंदी घालण्याचा बीसीबीचा...

मुस्ताफिजुर रहमान आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर आयपीएल 2026 च्या प्रसारणावर बंदी घालण्याचा बीसीबीचा सल्ला


आयपीएल २०२६ : बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांमुळे भारतात राजकीय वातावरण तापलं असून बांगलादेश सोबतच्या संबंधांमध्ये सुद्धा तणाव निर्माण झालेला आहे. शनिवारी बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेत बांगलादेशचा क्रिकेटर मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलमधून बाहेर करण्याचे निर्देश दिले. कोलकाता नाईट रायडर्सने बीसीसीआयच्या निर्देशांचे पालन करत मुस्तफिजूरला संघातून रिलीज केलं. 16 डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) हा एकमेव बांगलादेश खेळी होता ज्यावर फ्रेंचायझीने बोली लावून त्याला संघात घेतलं होतं. मुस्तफिजूरवर केकेआरने 9.20 कोटींची बोली लावली होती.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर केल्यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा तळतळाट झालाय. रिपोर्ट्समधून समोर आलंय की बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आयसीसीला पत्र लिहिलंय, ज्यात त्यांनी बांगलादेशचे भारतात होणारे सामने हे श्रीलंकेला शिफ्ट करण्याची मागणी केलीये. आयसीसीने अद्याप या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र बांगलादेशने यापूर्वीच आणखी एक मोठं पाऊल उचलण्याची योजना आखल्याची माहिती मिळतेय.

बांगलादेशमध्ये आयपीएलचं प्रसारण होणार नाही :

बांगलादेश सरकारचे सल्लागार आसिफ नजरुलने आधीच मागणी केलीये की बांगलादेशचे टी २० वर्ल्ड कप 2026 सामने हे श्रीलंकेत शिफ्ट केले जावेत. जसं पाकिस्तानच्या सामन्यांचं करण्यात आलं. बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण स्थगित करावे अशी विनंती त्यांनी बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारांना केली आहे, असेही आसिफ नजरुलने म्हटले.

आसिफ नजरुल म्हणाले, ‘मी माहिती आणि प्रसारण सल्लागारांना बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण बंदी घालण्याची विनंती केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बांगलादेशी क्रिकेट, क्रिकेटपटू किंवा बांगलादेशचा अनादर सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत’.

हेही वाचा : भारतासोबत तणावस्थिती असताना टी20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूला केलं कर्णधार

काय म्हणाला मुस्तफिजुर?

आयपीएलच्या 19 व्या हंगामातील बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानच्या सहभागावरून वाद निर्माण झाला होता. अनेक राजकीय पक्षांनी त्याच्या खेळण्यावर आक्षेप नोंदवला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला संघातून वगळण्याचे निर्देश फ्रँचायझीला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान BDCricTime शी संवाद साधताना मुस्तफिजुरने सांगितलं की, ‘जर त्यांनी मला करारमुक्त केलं असेल, तर मी काय करू शकतो?’ भारत आणि बांगलादेश यांच्यातील वाढत्या राजकीय तणावामुळे घेतलेल्या या निर्णयामुळे मुस्तफिजुर निराश झाल्याचेही वृत्त आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!