3 इडियट्सचा सिक्वेल: 2009 चा सर्वात सुपरहिट चित्रपट 3 Idiots च्या सीक्वलबाबत मोठी चर्चा मागिलकही दिवसांपासून रंगली आहे. अनेक रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की राजकुमार हिरानी या सीक्वलवर काम करतायत. तर काहींचं म्हणणं आहे की या चित्रपटातील आधीचे कलाकार आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र आता 3 Idiots चित्रपटाच्या सीक्वलच्या शक्यतांबाबत आमिर खान आणि आर माधवन यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय.
आर माधवन सीक्वलबाबत काय म्हणाला?
बॉलीवुड हंगामासाठी आर माधवन याची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत माधवन म्हणाला की, ‘3 इडियट्सचा सिक्वेल बनवणं चांगलं वाटतं. पण ते थोडं विचित्र सुद्धा वाटतं. आम्ही तिघेही, आमिर खान, शर्मन जोशी आणि मी, आता बरेच म्हातारे झालो आहोत. सिक्वेलमध्ये आम्ही कुठे जाणार? आता आमचं आयुष्य कसं असेल हे एक चांगली आयडिया आहे. पण चांगल्या सिक्वेलसाठी ते योग्य नाहीये. मला पुन्हा राजू हिरानींसोबत काम करायला आवडेल. पण पुन्हा 3 इडियट्स? मला वाटतं ते मूर्खपणाचं ठरेल’.
आमिर खान 3 Idiots च्या सीक्वलबाबत काय म्हणाला?
आमिर खानने म्हटले की, त्याला 3 Idiots चा सीक्वल करायला आवडेल पण अद्याप कोणी याबाबत त्याच्याशी संपर्क साधलेला नाही. आमिर म्हणाला की, ‘तो चित्रपट बनवताना आम्हाला खूप मजा आली! माझे पात्र, रँचो, हे माझे नेहमीचे आवडते पात्र आहे. लोक अजूनही रँचोबद्दल बोलतात. तर, हो, मला त्याचा सिक्वेल करायला आवडेल. पण कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही’.
हेही वाचा : …तरच मी लग्न करणार’ ‘सैराट’मधील आर्चीला खऱ्या आयुष्यात ‘असा’ जोडीदार हवा
3 इडियट्सने 400 कोटींची कमाई केली.
3 Idiots हा जगभरात 400 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट होता आणि परदेशात बॉक्स ऑफिस कामगिरीसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित केला. हा चित्रपट बराच काळ भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला. गेल्या काही वर्षांत, टीव्ही आणि ओटीटी स्ट्रीमिंगवर वारंवार प्रसारित झाल्यामुळे 3 Idiots च्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या चित्रपटात बोमन इराणी, करीना कपूर, ओमी वैद्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.






























