Homeदेश-विदेशचीन कंपनी झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीने आपल्या कर्मचाऱ्यांना घरे भेट दिली

चीन कंपनी झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीने आपल्या कर्मचाऱ्यांना घरे भेट दिली

चायना कंपनी गिफ्ट हाऊस: चीनमधील झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी नावाच्या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून महागडे फ्लॅट्स देण्याची खास योजना सुरू केलीय. चांगले आणि कुशल कर्मचारी कंपनीत दीर्घकाळ टिकावेत यासाठी कंपनीने हे पाऊल उचललंय. एकूण 450 कर्मचारी असलेल्या या कंपनीने 2024 मध्ये 70 मिलियन डॉलरची उलाढाल केली होती. असे फायदे देऊन कर्मचाऱ्यांमध्ये स्थिरता येईल आणि ते अधिक चांगले काम करतील, असा कंपनीला विश्वास आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

फ्लॅट्सची किंमत

कंपनी कर्मचाऱ्यांना 1.3 कोटी ते 1.5 कोटी रुपयांपर्यंत किंमतीचे फ्लॅट्स भेट म्हणून देतेय. हे फ्लॅट्स 1076 ते 1615 चौरस फूट आकाराचे आहेत. म्हणजेच एका कर्मचारी दांपत्याला 1550 चौरस फूटाचा फ्लॅट मिळालाय. हे फ्लॅट्स कंपनीच्या कारखान्यापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहेत. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना ये-जा करणे सोयीचे होते. स्थानिक बाजारात अशा फ्लॅट्सची किंमत खूप जास्त असते, त्यामुळे हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे.

कसे होणार वाटप?

कंपनीने एकूण 18 फ्लॅट्स वाटप करण्याचे ठरवले आहे. यंदा 2025 मध्ये 5 फ्लॅट्स देण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी 8 फ्लॅट्स देणार आहेत आणि पुढील तीन वर्षांत उरलेले फ्लॅट्स देण्यात येतील. हे फ्लॅट्स कंपनीच्या औद्योगिक भागाजवळील नवीन इमारतीत आहेत. ही योजना लॉंग टर्म विचार करुन बनवण्यात आलीय. यामुळे कर्मचारी कंपनीशी जोडले राहतील आणि नवीन कौशल्ये शिकतील, असा विश्वास कंपनी व्यवस्थापकांकडून व्यक्त केला जातोय.

पात्रतेसाठीच्या अटी काय?

हे फ्लॅट्स मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने कंपनीत किमान तीन वर्षे काम केलेले असावे. मात्र फ्लॅटचा पूर्ण मालकी हक्क मिळण्यासाठी 5 वर्षांची अधिकृत सेवा पूर्ण करावी लागते. फ्लॅट देण्यापूर्वी कंपनी एक करार करून घेते, ज्यात सेवा कालावधी आणि फ्लॅट हस्तांतरणाच्या नियमांचा समावेश असतो. ही योजना मुख्यतः कुशल तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आहे.

योजनेचे महत्त्व काय?

अशा प्रकारचे फायदे देऊन कंपनी कर्मचाऱ्यांना घराचे स्वप्न पूर्ण करतेय. जे विशेषतः परदेशी किंवा दूर राहणाऱ्या कामगारांसाठी फायदेशीर आहे. कंपनीच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांची निष्ठा वाढवेल आणि कंपनीची प्रगती होईल, असा विश्वास कंपनीचे जनरल मॅनेजर वांग जियायुआन यांना वाटतोय. जगात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देतात, पण एवढ्या मोठ्या रकमेचे घर भेट देणे  ही दुर्मीळ बाब आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!