Homeदेश-विदेशअलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या १२ महिलांना तात्काळ संरक्षण देण्यासाठी दिलासा...

अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या १२ महिलांना तात्काळ संरक्षण देण्यासाठी दिलासा दिला आहे

लिव्ह-इन रिलेशनशिपला बेकायदेशीर म्हणता येणार नाही आणि लग्नाच्या पावित्र्याशिवाय एकत्र राहणं हा गुन्हा नाही असं निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. राज्य प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करण्यास बांधील आहे आणि एखादं जोडपं अविवाहित असल्यास त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवत नाही असंही न्यायालयाने म्हटलं आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याने संरक्षण मागितलेल्या 12 याचिकांवर सुनावणी करताना, न्यायालयाने संबंधित जिल्ह्यांच्या पोलिस प्रमुखांना त्यांच्या शांततापूर्ण जीवनात अडथळा आणल्यास त्वरित संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

न्यायमूर्ती विवेक कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं की, “लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना सर्वांना मान्य असेलच असं नाही. परंतु असे म्हणता येणार नाही की असे नाते बेकायदेशीर आहे किंवा लग्नाच्या पावित्र्याशिवाय एकत्र राहणे हा गुन्हा आहे.”

याचिकाकर्त्यांनी दावा केला की त्यांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये पोलिसांकडे धाव घेतली, परंतु त्यांच्याकडे कोणतंही लक्ष दिलं गेलं नाही. न्यायालयाने सर्वांच्या पुनर्विचार याचिका एकत्र करत त्यावर सुनावणी घेतली. पुनर्विचार याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांनी पोलिसांना लोकांपासून संरक्षण देण्याचे आदेश देण्याची विनंती केली. यामध्ये  कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा सहकारी यांचा समावेश आहे. न्यायालयाने म्हटलं की, “सर्व रिट याचिकांमध्ये समाविष्ट असलेला वाद सारखाच असल्याने, त्यांचा निर्णय एका सामान्य निर्णयाद्वारे घेतला जात आहे.”

या आदेशात सरकारी वकिलांच्या युक्तिवादाचा संदर्भ देण्यात आला होता, ज्यांनी म्हटलं होतं की, “आपल्या देशाच्या सामाजिक रचनेला धोका देऊन लिव्ह-इन रिलेशनशिप स्वीकारता येत नाही. हे पक्ष कोणत्याही कायद्याने बांधील नाहीत आणि दोन्हीपैकी कोणताही भागीदार जेव्हा त्यांना आवडेल तेव्हा या नात्यातून बाहेर पडू शकतो. हा एक करार आहे. पक्षांकडून दररोज नूतनीकरण केले जाते आणि दुसऱ्या पक्षाच्या संमतीशिवाय दोन्ही पक्षांकडून तो संपुष्टात आणता येतो. अशा नात्याची कायदेशीर स्थिती नसते, अशा नात्यातून जन्माला येणाऱ्या मुलांची कायदेशीर स्थिती निश्चित केली जाणार नाही आणि त्यामुळे लिव्ह-इन पार्टनर्सच्या आयुष्यात अनेक गुंतागुंत निर्माण होतील. म्हणून, न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळवण्यापूर्वी, त्यांनी आधी लग्न करावे”.

सरकारी वकिलांनी पुढे असे म्हटले की जर याचिका मंजूर झाल्या तर, याचिकाकर्त्यांच्या वैयक्तिक निवडींवर देखरेख करणे, पुष्टी करणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे राज्यावर एक बंधन लादण्यासारखं आहे.

पालक आणि नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण दिले जाऊ शकते, परंतु अविवाहित जोडप्यांना कोणतेही संरक्षण दिले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तसंच विवाहेतर सहवासासाठी पोलिसांना वैयक्तिक सुरक्षा म्हणून काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.

युक्तिवादादरम्यान, सरकारी वकिलांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 28 एप्रिल 2023 रोजीच्या एका खंडपीठाच्या निकालाचा संदर्भ दिला, जिथे न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्यास नकार दिला होता. तथापि, या आदेशात म्हटले आहे की, “हे स्पष्ट आहे की न्यायालयाने असे म्हटले नाही की लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या सर्व जोडप्यांना न्यायालयाचे संरक्षण मिळण्यास पात्र नाही. हा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांशी सुसंगत नाही आणि सध्याच्या प्रकरणांमधील तथ्ये पूर्णपणे वेगळी आहेत.”

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!